`शिवाजी अंडरग्राऊंड' नाटकाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची हजेरी 

शरद पवार यांचे नाट्यप्रेम नेहमीच कौतुकाचा विषय राहिले आहे. मुलुंड येथे नुकत्याच झालेल्या नाट्य संमेलनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी मराठीतील चांगल्या गाजणाऱ्या नाटकांविषयी त्यांनी आस्थेने चौकशी केली. त्यानंतर ते आज थेट शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित राहिले.
`शिवाजी अंडरग्राऊंड' नाटकाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची हजेरी 

पुणे : राजकुमार तांगडे लिखित आणि नंदू माधव दिग्दर्शित 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक गेली काही वर्षे गाजते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा वेगळाचा अर्थ मांडणाऱ्या या नाटकाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज हजेरी लावली. त्यामुळे साहजिकच तो चर्चेचा विषय झाला.

पवार यांनी आज सकाळीच अरुण साधू यांच्या कादंबरीवरील झिपऱ्या या चित्रपटाच्या खेळाला हजेरी लावली होती. त्यानंतर ते संध्याकाळी नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित राहिले. 

हे नाटक शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीयदृष्ट्या हत्यार म्हणून केला जाणारा वापर, याविषयी सावध करते. शिवाजी महाराज हे केवळ एकाच धर्माचे रक्षणकर्ते होते, असा फसवा इतिहास सांगणाऱ्यांना इशारा देते. यातील बहुतांश कलाकार हे मराठवाड्यातील आहेत. नवखे कलाकार असूनही त्यांचा अभिनय लक्षवेधक ठरला आहे.

या नाटकाला पवार उपस्थित राहिल्याने साहजिक त्याविषयी विविध मते व्यक्त झाली. पुण्यातील शिंदे हायस्कुल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 व्या वर्धापन दिन आणि हल्लाबोल समारोप सभेत शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांचे स्वागत पुणेरी पगडीने नव्हे तर फुले पगडीने करा, असे जाहीर केल्यानंतर वादंग निर्माण होऊन राजकीय चर्चेला उधाण आले होते. त्यावर पुण्यात एका कार्यक्रमात पगडी संदर्भातील वक्तव्य कोणाच्या विरोधातील नव्हते, असे स्पष्ट करीत त्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या साऱया वादाची पार्श्वभूमी या उपस्थितीमागे आहे.

पवार यांचे नाट्यप्रेम सर्वश्रुत आहेत. त्यामुळे या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थितीचा वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही, असे पवार यांच्या समर्थकांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com