Sharad Pawar Asked Party Workers to Seat in the Shadow | Sarkarnama

...आणि शरद पवारांनी शेकडो कार्यकर्त्यांना सावलीत बसवून घेतले

संजय मिस्किन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

बीड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी बागलाने मैदान तुडंब भरून गेले होते. मैदानाइतकीच गर्दी मैदाना बाहेर आहे. उन्हामध्ये हे कार्यकर्ते उभे राहून सभा ऐकत होते.

बीड : मोठी माणसे मोठी का असतात हे लहान लहान गोष्टीमधून लक्षात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ही मोठेपणे कसे आहे आणि कार्यकर्त्यांची त्यांना किती काळजी आहे याचा प्रत्यय आज बीड मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. पवार यांनी फक्त एक हात केला आणि उन्हात उभ्या राहिलेल्या हजारो कार्यकर्त्यांना सावली मिळाली.

बीड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी बागलाने मैदान तुडंब भरून गेले होते. मैदानाइतकीच गर्दी मैदाना बाहेर आहे. उन्हामध्ये हे कार्यकर्ते उभे राहून सभा ऐकत होते. पवार यांना झेड सुरक्षा असल्यामुळे 'डी' झोन (व्यासपीठासमोरील मोकळी जागा) करण्यात आला होता. या झोन मध्ये पोलीसांशिवाय कोणीच नव्हते आणि बाहेर मात्र हजारो लोक उन्हात उभे होते.

पवार साहेबां यांच्या नजरेत ही गोष्ट येताच त्यांनी बाजुला बसलेल्या धनंजय मुंडेंना उन्हात असलेल्या लोकांना डी झोनमध्ये बसू द्या, अशी सुचना केली. माझ्या सुरक्षेपेक्षा उन्हातील लोकांची मला जास्त काळजी वाटते असे ते म्हणाजे.

 मुंडेंनी पोलीसांना त्या प्रमाणे सुचना दिली आणि एका क्षणात उन्हातील हजारो कार्यकर्ते 'डी झोन' मधल्या सावलीमध्ये येऊन बसले. आता त्यांना साहेबांना त्यांना अगदी जवळून पहावयास मिळत होते, याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच जाणवत होता.

संबंधित लेख