sharad pawar and nashik | Sarkarnama

नाशिकमध्ये शनिवारी पवारांचा सरकारवर हल्ला बोल

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 मार्च 2018

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील हल्ला बोल आंदोलनाची सांगता शनिवारी येथील गोल्फ क्‍लब मैदानावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. यानिमित्ताने पक्षाचे सर्वच नेते नाशिकला येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असून या सभेला एक लाख लोक उपस्थित राहतील अशी तयारी केली असल्याने नाशिकची राजकीय समीकरणे बदलतील काय अशी चर्चा आहे. 

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजीमंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, भास्कर जाधव, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, नवाब मलिक आदी सर्वच नेते नाशिकला जमा होणार आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता शनिवारी (ता. 10) सायंकाळी पाचला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे "हल्लाबोल यात्रा' राज्यभर सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात सभा झाल्यात. उत्तर महाराष्ट्रातील यात्रेची सांगतानिमित्त नाशिकमध्ये सभा होत आहे. त्यासाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येत असलेल्या व्यासपीठाचे भूमीपूजन नानासाहेब महाले यांच्या हस्ते झाले. 

शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, अर्जून टिळे, नगरसेवक गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक आदी उपस्थित होते.त्यासाठे गेले आठवडाभर उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतील यंत्रणा सक्रीय झाली आहे. याबाबत तालुकानिहाय बैठका सुुर आहेत. एक लाखांची गर्दी जमविण्याचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच एक मोठा राजकीय कार्यक्रम होत आहे. त्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख