sharad pawar and kolhapur | Sarkarnama

" तु ठरवलयंस, तर मी बी ध्यानात ठेवलंय ' : शरद पवार यांचा सतेज पाटील यांना टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

कोल्हापूर : मला काही कार्यकर्त्यांनी सांगितले की कोल्हापुरात एकाने "आमचं ठरलंय' असा प्रचार सुरू केलाय, माहिती घेतली तर तो आमचाच भाऊबंद असल्याचे समजले. तु ठरवलयंय तर मी बी ध्यानात ठेवलंय, असा टोला आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना त्यांचे नांव न घेता लगावला. 

कोल्हापूर : मला काही कार्यकर्त्यांनी सांगितले की कोल्हापुरात एकाने "आमचं ठरलंय' असा प्रचार सुरू केलाय, माहिती घेतली तर तो आमचाच भाऊबंद असल्याचे समजले. तु ठरवलयंय तर मी बी ध्यानात ठेवलंय, असा टोला आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना त्यांचे नांव न घेता लगावला. 

लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक व खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ श्री. पवार कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांची कागल येथे सभा झाली तर आज पेठ वडगांव येथे श्री. शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी आमदार पाटील यांना चिमटा काढला. आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना उघडपणे विरोध केला आहे. श्री. महाडिक हे आघाडीचे उमेदवार असूनही आमदार पाटील यांनी त्यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेची दखल प्रदेश पातळीवरील दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. 

पण थेट पाटील यांच्याशी चर्चा करून वाद मिटवण्याच्या भानगडीत कोण पडलेले नाही. श्री. पाटील यांनी "आमचं ठरलंय' हे घोषवाक्‍य घेऊन श्री. महाडिक यांना विरोध करताना शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात उडी घेतली आहे. या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पवार याविषयी काय बोलतात ही उत्सुकता होती. पण 2 एप्रिल रोजी श्री. पवार कोल्हापुरात होते, त्यावेळी ते यावर काही बोलले नाही, काल कागलच्या सभेतही त्यांनी यावर भाष्य केले नाही. पण आज पेठवडगावच्या सभेत मात्र श्री. पवार यांनी श्री. पाटील यांना टोला लगावला. 
ते म्हणाले," मला कोल्हापुरात आल्यानंतर एका कार्यकर्त्याने सांगितले की कोणीतरी "आमचं ठरलंय' म्हणून वेगळा प्रचार करत आहे. मी माहिती घेतली तर तो आमचाच भाऊबंद असल्याचे समजले. तु ठरवलयंस तर मी बी ध्यानात ठेवलंय.' श्री. पवार यांच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर केला. 

 

संबंधित लेख