sharad pawar and farmer | Sarkarnama

पंजाबमधील एका शेतकऱ्याने पवारांना देवाची उपमा दिली...

डॉ.जनार्दन वाघमारे, माजी खासदार, लातूर
बुधवार, 12 डिसेंबर 2018

एकदा दिल्लीत शरद पवारांचा आम्ही वाढदिवस साजरा करत असतांना तिथे पंजाबमधून एक शेतकरी आला होता. त्याने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण " तुम्ही शेतकऱ्यांचे देव आहात' असे गौरवाचे उद्‌गार देखील काढले होते अशी आठवण लातूरचे माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली. 
शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त डॉ. जनार्दन वाघमारे यांनी त्यांच्यासोबतच्या काही प्रसंगांना उजाळा दिला.

लातूर : यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण बनवणारे नेते म्हणून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा उल्लेख केला जातो. एकदा दिल्लीत शरद पवारांचा आम्ही वाढदिवस साजरा करत असतांना तिथे पंजाबमधून एक शेतकरी आला होता. त्याने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण " तुम्ही शेतकऱ्यांचे देव आहात' असे गौरवाचे उद्‌गार देखील काढले होते अशी आठवण लातूरचे माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली. 
शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त डॉ. जनार्दन वाघमारे यांनी त्यांच्यासोबतच्या काही प्रसंगांना उजाळा दिला. ते म्हणाले केंद्रात युपीएचे सरकार आले तेव्हा डॉ. मनमोहनसिंग यांचे पंतप्रधान म्हणून नाव जाहीर झालेले नव्हते. 

त्यावेळी कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घ्यायचा निर्णय घेतला होता. त्यासाठी डॉ. मनमोहनसिंग व प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे चर्चेसाठी पाठवले होते. शरद पवार मागतील ते खाते, मंत्रीपद देण्याची तयारी कॉंग्रेसने ठेवली होती. जेव्हा डॉ. मनमोहनसिंग व प्रणव मुखर्जी शरद पवारांकडे गेले तेव्हा त्यांनी ही गोष्ट त्यांना देखील सांगितली होती. अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री असे कोणतेही मंत्रिपद मागितले असते तर ते शरद पवार साहेबांना त्यावेळी मिळाले असते. पण पद मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या नेत्यापैकी ते नव्हते. पवारांनी सिंग आणि मुखर्जी यांच्याकडे आपल्याला कृषीमंत्री पद हवे असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रणव मुखर्जींनी आश्‍चर्यही व्यक्त केले होते. 

शरद पवारांनी दहा वर्ष कृषीमंत्रीपद यशस्वीपणे संभाळले. त्यानंतर काही वर्षांनी अखिल भारतीय कृषि संशोधन परिषद झाली. यात महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण व शरद पवार या दोन सुपूत्रांनी देशाला अन्नधान्यात स्वंयपूर्ण बनवले असे गौरवोदगार प्रणव मुखर्जी यांनी काढले होते. पवार साहेबांशी आमची अनेकवेळा चर्चा व्हायची. प्रत्येक चर्चेत ते बाहेर पाहून आलेल्या शेती संशोधनाची आम्हाला माहिती द्यायचे. एकदा त्यांचा आम्ही दिल्लीत वाढदिवस साजरा केला. त्यावेळी पंजाब मधील एक शेतकरी तेथे आला होता. श्री. पवार हे आमचे देव आहेत असे उदगार त्याने काढले होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या वेळेस देखील त्यांची भूमिका महत्वाची राहिली. जगाच्या पाठीवर असा कायदा झालेला नाही. 
 

संबंधित लेख