शरद पवारांनी मला नेहमीच पाडण्याचा प्रयत्न केला; पण यंदा मीही कंबर कसली : प्रकाश आंबेडकर

शरद पवारांनी मला नेहमीच पाडण्याचा प्रयत्न केला; पण यंदा मीही कंबर कसली : प्रकाश आंबेडकर

सोलापूर : शरद पवार यांनी मला नेहमीच निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा ते यशस्वीही झाले. मात्र मीही सोलापूरसाठी कंबर कसली होती', असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केले.

सोलापूर लोकसभा जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. त्या अनुषंगाने आंबेडकर यांनी 'सरकारनामा'शी संवाद साधला. आंबेडकर यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे डॉ. सिद्धेश्वर यांच्याशी सामना आहे. मात्र शिंदे यांच्या विजयासाठी पवार हेही प्रचार मैदानात तर उतरले होतेच, शिवाय दोन टप्प्यात त्यांनी बैठका घेऊन शिंदे यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावर आंबेडकर यांना विचारले असता, यंदा मीही कंबर कसल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूरची भूमी धर्मनिरपेक्ष असल्याचे शिंदे यांनी म्हटले होते. नेमका हाच धागा पकडून
आंबेडकर पुढे म्हणाले, 'गेल्या निवडणुकीतही शिंदे यांनी शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले होते. मात्र यंदाही ते लढत असून मी वर्तमानाचा विचार करणारा आहे. सोलापुरची भूमी धर्मनिरपेक्ष असली, तरी त्यात कायम बळी हा मुस्लिमांचा गेलेला आहे. मात्र त्यांना वाचवण्यासाठी कोणीच आले नाही. मला सोलापुरात अनुकूल वातावरण आहे.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com