sharad pawar on ahmad patel | Sarkarnama

अहमद पटेल आमच्यामुळे निवडून आले : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 ऑगस्ट 2017

कॉंग्रेस नेते अहमद पटेल हे गुजरातमधून राष्ट्रवादीच्या मतामुळे राज्यसभा निवडणुकीत निवडून आल्याचे खासदार शरद पवार यांनी रविवारी सांगितले. 

पुणे/कोल्हापूर : कॉंग्रेस नेते अहमद पटेल हे गुजरातमधून राष्ट्रवादीच्या मतामुळे राज्यसभा निवडणुकीत निवडून आल्याचे खासदार शरद पवार यांनी रविवारी सांगितले. 

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीविषयी भाष्य केले. गुजरातमधील आमचे 2 आमदार निर्णायक होते. त्यातील एकाने पक्षादेश मानणार नाही, भाजपबरोबर जाणार असल्याचे सांगितले होते. आमचे दुसरे मत अहमद पटेल यांना मिळाले, त्यामुळे ते निवडून आले, असे पवार म्हणाले. 

देशपातळीवर भाजपेतर पक्षांची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, पण यात कॉंग्रेसचा धरसोडपणा सुरु असल्याचे पवार म्हणाले. 

संबंधित लेख