sharad pawar about pune loksabha | Sarkarnama

पुणेच काय महाराष्ट्रातील कोणत्याच मतदारसंघातून पवार लढणार नाहीत!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

यासंबंधीचे ट्‌वीट राष्ट्रवाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघातून लढण्याच्या चर्चांना स्वत: राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी पुर्णविराम दिला आहे. मुंबईत सुरु असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले. 

शरद पवार पुण्यातून लढणार आणि त्यासाठी कॉंग्रेसच्या कोट्यातील जागा राष्ट्रवादी घेणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. मुंबईतुल राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील प्रवक्‍ते अंकुश काकडे यांनीही पवारांनी पुण्यातून लढावे, अशी मागणी काल केली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तसा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले होते.  

आज मुंबईत राष्ट्रवादी पक्ष लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहे. त्याचवेळी स्वत: पवार यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. यासंबंधीचे ट्‌वीट राष्ट्रवाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

संबंधित लेख