sharad pawar about maratha reservation | Sarkarnama

धनगर आरक्षणाप्रमाणे मराठा समाजाचीही फसवणूक होऊ शकते : पवार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ही घटनादुरुस्ती लक्षात घेतली नसावी.

पाटण (सातारा) : दोन्ही कॉंग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून 48 पैकी 40 जागांवर दोन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. उर्वरित आठ जागांबाबत प्रदेश पातळीवरील नेत्यांची बोलणी सुरू असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल. मात्र लोकसभेसाठी अद्याप महाआघाडी झाली नसली तरी प्रत्येक राज्यांत घटक पक्ष व कॉंग्रेस यांच्यातील आघाडीचा निर्णय त्या-त्या राज्यापुरता घ्यावा, या स्वरूपाची चर्चा झाली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

पाटण (जि. सातारा) येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमानंतर श्री. पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. पवार म्हणाले, भाजप सरकारने राज्यात मराठा आरक्षण लागू करण्याच्या महिनाभरापूर्वी केंद्राने 102 व्या घटनादुरुस्तीचा मसुदा तयार केला आहे. त्यानुसार एखाद्या समुहाबाबतच्या सामाजिक आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यायचा झाल्यास राष्ट्रपतींनी अध्यादेश काढून संस्थेच्या माध्यमातून निर्णय घेऊ शकतात, असे त्यात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ही घटनादुरुस्ती लक्षात घेतली नसावी, त्यामुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या पातळीवर कितपत टिकणार याबाबत घटनातज्ञांकडून शंका व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा आरक्षणाबाबत कार्यवाही करावी, अन्यथा धनगर समाजाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा समाजाची ही फसवणूक होऊ शकते, अशी भीती आहे. 

संबंधित लेख