sharad pawar about d y patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

डी. वाय. पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी प्रवेशासाठी संपर्क केला होता!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेता माझ्यासोबत काम करण्यास इच्छुक असेल तर त्यांचे स्वागत आहे.  

सातारा : काँग्रेस नेते आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजलेली आहे. डी. वाय. पाटील यांचे पुत्र आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना अंधारात ठेवून हा निर्णय झाल्याने तेही नाराज आहेत.

यासंदर्भाने पक्षप्रमुख शरद पवार यांनी खुलासा केला आहे.पवार पाटणमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी माझ्यासोबत काम करण्याची इच्छा असून मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेता माझ्यासोबत काम करण्यास इच्छुक असेल तर त्यांचे स्वागत आहे.  

संबंधित लेख