sharad pawar aamir khan water cup | Sarkarnama

शरद पवारांना आमिर खानच्या `वॉटर कप'चे कौतुक

तुषार खरात
रविवार, 4 मार्च 2018

मुंबई : लोकांचा सक्रीय सहभाग घेऊन जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात राबविण्याचे काम अभिनेते आमिर खान `वॉटर कप`च्या माध्यमातून करीत आहेत. 

या कामांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आकर्षित केले आहे. त्याच अनुषंगाने `वॉटर कप`मध्ये सहभागी झालेल्या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी शरद पवार स्वतः भेट देणार आहेत.

येत्या एप्रिल महिन्यापासून `वॉटर कप` स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत उतरलेल्या, तसेच गेल्या वर्षी स्पर्धेत उत्कृष्ट काम केलेल्या गावांना ३१ मार्च रोजी भेटी देण्याचा कार्यक्रम पवार यांनी निश्चित केला आहे. 

माण तालुक्यातील (जि. सातारा) काही गावांमध्ये पवार स्वतः जाणार आहेत. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी या दौऱयाची आखणी केली आहे. वॉटर कपमध्ये लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊन श्रमदान करतात. 

सीसीटी, माती बांध, कंपार्टमेंट बंडींग, दगडी बांध, वृक्षारोपण, तलावातील गाळ काढणे अशी कामे लोक श्रमदानातून करतात. माण तालुक्यात बिदाल, किरकसाल अशा अनेक गावांनी `वॉटर कप`अंतर्गत श्रमदानातून मोठी कामे केली आहेत. किरकसाल या गावाला पवार यांनी गेल्या वर्षीही भेट दिली होती. 

लोकांनी एकत्रित येऊन केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदाही ते पुन्हा माण तालुक्यातील वॉटर कपमध्ये सहभागी झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे देशमुख म्हणाले.  

संबंधित लेख