sharad bansode mp solapur | Sarkarnama

आजचा वाढदिवस : शरद बनसोडे, भाजप खासदार सोलापूर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 एप्रिल 2018

तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत करून देशाच्या राजकारणात खासदार शरद बनसोडे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके खासदार म्हणून बनसोडे यांची ओळख आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक मोठी शहरे असताना सोलापूर व पुण्याचा समावेश झाला. सोलापूरच्या समावेशात खासदार बनसोडे यांचा मोलाचा वाटा आहे. कायद्याचे उच्च शिक्षित, मुंबई आमचीच यासह इतर मराठी चित्रपटाचे अभिनेते म्हणूनही खासदार बनसोडे यांची ओळख आहे.

तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत करून देशाच्या राजकारणात खासदार शरद बनसोडे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके खासदार म्हणून बनसोडे यांची ओळख आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक मोठी शहरे असताना सोलापूर व पुण्याचा समावेश झाला. सोलापूरच्या समावेशात खासदार बनसोडे यांचा मोलाचा वाटा आहे. कायद्याचे उच्च शिक्षित, मुंबई आमचीच यासह इतर मराठी चित्रपटाचे अभिनेते म्हणूनही खासदार बनसोडे यांची ओळख आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंचाच्या माध्यमातून बनसोडे यांनी समाजकारणाला व राजकारणाला सोलापूरमधून सुरवात केली. 

संबंधित लेख