shankarrao gadakh statement in maratha morcha nevasa | Sarkarnama

#MarathaReservation आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ आलीय :गडाख 

सुनील गर्जे 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नेवासे (जि. नगर) : आंदोलकांनी दिलेले बलिदान व्यर्थ जावू देणार नाही. शासन मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचा अंत पहात आहे. त्यामुळे आता आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ आली आहे, असा इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिला. 

नेवासे (जि. नगर) : आंदोलकांनी दिलेले बलिदान व्यर्थ जावू देणार नाही. शासन मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचा अंत पहात आहे. त्यामुळे आता आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ आली आहे, असा इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिला. 

मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण या मागणीसह हुतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिला, तरुणींसह विद्यार्थी-विद्यार्थींनीसह हजारो समाजबांधवांच्या मोठा सहभागी झाले होते. यावेळी भगवे, पिवळे व हिरवे झेंडे हातात असलेले शेकडो तरुणांच्या आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणेने नेवासे शहर दणाणले होते. दरम्यान, मोर्चेकरी व पोलिसांचे समन्वयामुळे धडक मोर्चा असूनही या वेळी मोर्चात मोठी शिस्त पहायला मिळाली. 

आरक्षणाच्या मुद्द्यावर या तीनही समाजाने एकमेकांना पाठिंबा देत काढण्यात आलेल्या मोर्चाचा प्रारंभ नेवासे येथील इस्तेमा मैदानातून सरकार विरोधी घोषणांनी मोर्चा तहसीलवर धडकला. माजी आमदार शंकरराव गडाख, विठ्ठल लंघे, भैय्यासाहेब देशमुख वगळता तालुक्‍यातील बहुतांशी नेत्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली. यावेळी तहसीलच्या मुख्यप्रवेशव्दारा शासनाच्या निषेध सभा झाली. सभेदरम्यान शंकरराव गडाख हे पाठीमागे मोर्चेकऱ्यांत बसले होते. मात्र आयोजकांनी अनेक वेळा विनंती करूनही ते समोर न आल्याने आयोजकांनी त्यांना आग्रह करत हाताला धरून समोर आणले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख