shankararao gadakh agitation near mula dam | Sarkarnama

एका जरी शेतकऱ्याला काठी लागली तरी मुळा धरणात जलसमाधी घेईन!

विलास कुलकर्णी
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

धरणाच्या दोन किलोमीटर अलिकडे पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांची वाहने अडवली

राहुरी (नगर) : पोलीस प्रशासनाने दडपशाही करू नये. एका जरी शेतकऱ्याला काठी लागली तरी मुळा धरणात जलसमाधी घेईन, असा इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिला.

मुळा धरणावर आंदोलनात सायंकाळी ते बोलत होते. आज (गुरुवारी) नेवासे येथून शेकडो शेतकऱ्यांसह माजी आमदार गडाख यांनी मुळा धरण गाठले. 

धरणाच्या दोन किलोमीटर अलिकडे पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांची वाहने अडवली. त्यातच पाऊस सुरु झाला. भर पावसात शेतकरी बारागाव नांदूर मार्गेधरणाच्या भिंतीजवळ पोहोचले. मुळा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे धरणावर उपस्थित होते.

शंकराव गडाख म्हणाले, 'नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती व मुळा धरणात कमी पाणीसाठा असताना मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय 'राजकीय' आहे. उच्च न्यायालयाने मराठवाड्याला पाणी सोडा, असा निर्णय दिलेला नाही. नगर जिल्ह्यातील दोन्ही धरणांची शेती व पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीचा विचार करून मग निर्णय घ्या. अशी सूचना न्यायालयाने केली. गोदावरी खोरे विकास महामंडळ आणि हा निर्णय एकतर्फी घेतला." 

संबंधित लेख