shambhuraj desai write letter to cm | Sarkarnama

शिवसेना आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने बैठक लावा! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

सातारा : राज्यात मराठा क्रांती मोर्चाला लागलेले हिंसक वळण थांबवून आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांशी सर्वपक्षीय मराठा आमदारांची उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे. 

देसाई यांनी म्हटले की, मराठा आरक्षणासंदर्भात संपूर्ण राज्यात आजपर्यंत एकूण 58 मराठा क्रांती मोर्चे शांततेच्या मार्गाने झाले आहेत. मात्र, सध्या मराठा समाजाच्या संयमाचा बांध फुटला असून आंदोलन हिंसक वळण घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय मराठा आमदारांनी सभागृहात तसेच सभागृहाबाहेरही आग्रही राहून वारंवार शासनापुढे भुमिका मांडत आलो आहोत. 

उच्च न्यायालयाने विचारणा केल्याप्रमाणे राज्य शासनाने राज्य मागास प्रवर्ग आयोग स्थापन केल्याचे म्हणणे उच्च न्यायालयाला दिले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य मागासप्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे सर्वपक्षीय मराठा आमदारांची उच्चस्तरीय एकदिवसीय बैठक राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसमवेत लवकरात लवकर आयोजित करावी, असे देसाई यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख