Shambhuraj Desai Diwali | Sarkarnama

सुरेल सायंकाळी रंगली शंभूराज देसाईंची दिवाळी 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

खाऊ दिवाळी, लेवू दिवाळी आणि सजवू दिवाळी या उद्देशाने आमदार शंभूराज देसाई यांनी कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या दिवाळी फराळाची सुरेल सायंकाळ उत्साहात साजरी झाली. 

मोरगिरी : खाऊ दिवाळी, लेवू दिवाळी आणि सजवू दिवाळी या उद्देशाने आमदार शंभूराज देसाई यांनी कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या दिवाळी फराळाची सुरेल सायंकाळ उत्साहात साजरी झाली. 

पाटण मतदारसंघातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी दिवाळी फराळ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात एकमेव पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी अशा अनोख्या पद्धतीने दिवाळी उत्सव साजरा करणार असल्याने यांच्या या उपक्रमाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे दिवाळी फराळास आलेल्या सर्वाचा आनंद द्विगुणीत तर झालाच परंतु उपस्थितांनी या उपक्रमास चांगलीच दाद दिली. 

आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समूहातील अधिकाऱ्यांनी या दिवाळी फराळाचे अत्यंत नेटके नियोजन केले होते. आमदार शंभूराज देसाई यांनी स्वतः दिवाळीचे खाद्य पदार्थ घेवून या कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर आमदार देसाई यांनी स्वतः प्रत्येक टेबलजवळ जावून इतरांनी फराळ घेतला आहे का? यांची चौकशी करीत होते. 

कार्यक्रमस्थळी प्रा. सुरेश शुक्‍ल निर्मीत स्वरांगण या मराठी गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. फराळ्याच्या गोडीबरोबर गाण्याच्या आस्वादाने दिवाळी फराळाची सुरेल सायंकाळ उत्साहात साजरी झाली. सुरेल संगीतावरील गाणी ऐकत आलेला प्रत्येकजण या दिवाळी फराळ्याच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक करीत होता. त्यामुळे या अनोख्या उपक्रमामुळे दिवाळी फराळास आलेल्या सर्वाचा आनंद तर व्दिगुणीत झाला परंतु या उपस्थितांनी या उपक्रमास चांगलीच दाद दिली. 

आपण सर्वजण आपआपल्या घरी दिवाळी सण साजरा करतो. परंतु रोजच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपल्याला प्रत्येकालाच वेळ देता येत नाही. त्यांना आर्वजून भेटण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमामुळे संधी मिळाली. त्याचबरोबर सामान्यातील सामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी, मान्यवर यांना तालुक्‍याचे आमदार शंभूराज देसाई यांच्याबरोबर दिवाळी साजरी करता आली. याचे समाधान येथील प्रत्येकांच्या चेहर्यावर दिसत होते. येथे आलेला प्रत्येकजण धकाधकीचे जीवण विसरूण एकमेकाशी असलेले नाते जपण्यासाठी आल्याचे दिसत होते. 

दिवाळी फराळाच्या कार्यक्रमास जिहाधिकारी श्वेता सिंघल, प्रांतअधिकारी, तहसीलदार, पोलिस निरिक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी, वकील, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष, उपाअध्यक्ष संचालक, विविध गावचे सरपंच, यांची उपस्थिती होती. 

आमदार शंभूराज देसाई यांच्या या दिवाळी फराळाचे हे दुसरे वर्ष असून या फराळाच्या निमित्ताने येथे आलेला प्रत्येकजण धकाधकीचे जीवन विसरून एकमेकाशी संवादात रमले होते. सामान्यातील सामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आमदार शंभूराज देसाई यांच्याबरोबर दिवाळी साजरी करता आली. 

संबंधित लेख