shambhuraj desai and social workers | Sarkarnama

शंभूराज देसाईंची चाय पे चर्चा, ती पण हॉटेलाच्या बाकड्यावर बसून

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

ढेबेवाडी (ता. पाटण, जि. सातारा) : कार्यकर्त्यांच्या अडचणीत हाकेला धावून जाणारे आणि प्रसंगी राजकारणाची झूल बाजूला फेकून जनतेच्या प्रश्नांसाठी तडक रस्त्यावर उतरणारे नेतृत्व अशी पाटण तालुक्‍याचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांची ओळख आहे. कधी सामान्य कार्यकर्त्याच्या घरात जमिनीवर मांडी घालून जेवणाचा अस्वाद घेत राजकारणाबाहेरच्या गप्पा मारताना तर कधी एखाद्या आजारी कार्यकर्त्याची दवाखान्यात किंवा घरी जाऊन आस्थेवायिकपणे चौकशी करताना दिसतात. पण काल (शनिवारी) सायंकाळी ढेबेवाडीच्या चौकातील छोट्याशा हॉटेलात बाकड्यावर बसून चहा पिताना पाहून अनेकांना त्यांच्यातील साधेपणाची झलक पहायला मिळाली. 

आमदार देसाई काल सायंकाळी ढेबेवाडी विभागात एका कार्यक्रमासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या वाहनांचा ताफा येथील बसस्थानकाच्या परिसरातील चौकात थांबला. चौकात त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. तिथे स्वागत झाल्यानंतर तडक चालत ते कार्यकर्ते शंकर चौधरी यांच्या चौकातील हॉटेलात गेले. चौकात छोट्याशा गाळ्यामध्ये हे साधेच हॉटेल आहे. अचानक आमदार आलेले पाहून चौधरींचीही तारांबळ झाली. 
हॉटेलातील बाकड्यावर बसून आमदार देसाई यांनी कार्यकर्त्यांसमवेत चहा घेत पंधरा-वीस मिनीटे गप्पाही मारल्या. रणजीत पाटील, विकास गोसावी, अंकूश महाडीक, नाना साबळे, सुरेंद्र जाधव, सुहास पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

संबंधित लेख