shalinitai patil press in satara | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

मी कोरेगावात राहण्यास येणार : शालिनीताई

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात माझा पराभव सत्ता आणि पैशाने झाला आहे.

सातारा : 'कोरेगावच्या जनतेची इच्छा असेल आणि प्रकृतीने साथ दिल्यास मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढेन. जर प्रकृतीने साथ दिली नाही तर कुटुंबातील कोणीतरी अथवा माझा एखादा कार्यकर्ता निवडणूक लढवेल,' असे मत माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

मराठा आरक्षणाबद्दल आवाज उठवल्याबद्दल शालिनीताईंचा उद्या (शनिवारी) सातारारोड येथे सत्कार होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या आज साताऱ्यात दाखल झाल्या.

शालिनीताई पाटील म्हणाल्या,  मी मुंबई ते कोरेगाव असा प्रवास करुन आले असून आजच्या प्रवासाने मला बळकटी मिळाली आहे. मी लवकरच कोरेगावात राहण्यास येणार आहे. येथील लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे आहेत. दहा वर्षे मी कोरेगावच्या संपर्कात नव्हते. परंतु येथील परिस्थिती माझ्या कानावर येत होती. काही बदल झालेला नाही. कोरेगावच्या जनतेची इच्छा असेलतर आणि प्रकृतीने साथ दिल्यास कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढणार आहे. प्रकृतीने साथ दिली नाहीतर कुटुंबातील कोणीतरी अथवा माझा एखादा कार्यकर्ता निवडणूक लढवेल. 
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात माझा पराभव सत्ता आणि पैशाने झाला आहे. काही मतांना दहा - दहा हजार रुपयांचे वाटप झाल्याचा आरोपही त्यांनी केला.  

 

संबंधित लेख