shalinitai patil criticise mla shashikant shinde | Sarkarnama

शशिकांत शिंदेंनी मटण, दारूच्या बाटल्या देऊन मते मिळवली!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

त्या पराभवापासून शालिनीताई कोरेगाव सोडून मुंबईत वास्तव्यास आहेत.

सातारा : 'माझा पराभव आर्थिक सत्तेने केला. विरोधकांनी मतदारांना मटण, दारुच्या बाटल्या दिल्या. एका घरामध्ये दहा दहा हजार रुपयांचे वाटप केले', अशा शब्दांत माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी स्वत:च्या पराभवाची कारणमिमांसा केली. 

2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्या पराभवापासून शालिनीताई कोरेगाव सोडून मुंबईत वास्तव्यास आहेत. आज साताऱ्यात आलेल्या शालिनीताईंनी शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून टीका केली, तसेच कोरेगावात राहण्यास येणार असल्याचे सांगितले.

विद्यमान लोकप्रतिनिधींच्या विकासकामाबाबत आपण समाधानी आहे का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, मी दहा वर्षे आमदार असताना जी कामे झाली आहेत ती कामे आहे तशीच आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांत काहीच कामे झालेली नाहीत. नवीन काही घडलेले नाही. त्यांनी काहीच केलेले नाही. एवढे दिवस काय झोपला होता काय..?,' असा सवालही त्यांनी  केला.

संबंधित लेख