shailesh mohite appointed as national secretary | Sarkarnama

शैलेश मोहिते पाटील राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय सरचिटणीस

रुपेश बुट्टे पाटील
सोमवार, 25 मार्च 2019

आंबेठाण : खेड तालुक्यातील डॉ. शैलेश मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी युवकच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर पद मिळणारी खेड तालुक्यातील ही पहिलीच निवड आहे.

त्यांनी या आधी तालुका ते राज्य पातळीपर्यंत विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळल्या आहेत.
सध्या ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. 

या काळात युवक जोडो अभियानाअंतर्गत विकास रथाच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर २०१६ ते २०१८ पर्यंत प्रदेश उपाध्यक्ष म्हणून योगदान दिले. त्या काळात पक्ष निरीक्षक म्हणून विदर्भ, नाशिक, नगर, सांगली या भागांचे काम पाहिले.

जुलै २०१८ पासून ते आतापर्यंत विविध राज्यांत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्यासोबत कर्नाटक,केरळ,राज्यस्थान,जम्मू काश्मीर,हरियाना, पंजाब,लक्षद्वीप,दिल्ली,उत्तर प्रदेश,गोवा महाराष्ट्र या राज्यात दौरा केला. त्यात विविध मोर्चे,रास्ता रोको,सभांचे आयोजन केले होते. तसेच देशात १४ धर्मनिरपेक्ष पक्षांच्या युवक संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या “युनिटेड युथ फ्रंट” या संघटनेच्या माध्यमातून जंतर मंतर दिल्ली, वाराणसी येथे युवक मोर्चाचे यशस्वी नियोजन केले होते. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, असे मोहिते यांनी सांगितले. 

संबंधित लेख