Shahu Maharaj is unhappy for Kolhapur not getting C.M. Post | Sarkarnama

कोल्हापूरला मुख्यमंत्रीपद नसल्याची शाहू महाराजांना खंत 

सदानंद पाटील 
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर जिल्हा आणि कागल तालुक्यात कागल तालुक्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे.

कोल्हापूर : "कोल्हापूर हा छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने चालणारा जिल्हा आहे. मात्र राजकारणात या जिल्ह्यावर अन्याय झाला असून तो बाजूला आहे. म्हणूनच या जिल्ह्याला आजपर्यंत मुख्यमंत्री पद मिळाले नाही ,"  अशी खंत, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. 

" कोल्हापूर जिल्हा आणि कागल तालुक्यात कागल तालुक्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी त्याकडे लक्ष द्यावे. गोरगरीब जनतेसाठी वेळ द्यावा. जनतेच्या सुखातच  त्यांनी समाधान मानावे ." 

"आपली तिजोरी भरण्यापेक्षा जनतेच्या ईच्छा, आकांक्षाची  तिजोरी भरावी. आणि हाच खरा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहु राजर्षी शाहु महाराजांचा विचार आहे. हाच विचार राज्यालाही प्रगतीपथावर पोहोचवेल,"  असा विश्वास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख