shahu maharaj descision about mumbai meeting | Sarkarnama

शाहू महाराजांना मुंबईला नेण्यासाठी धडपडणारे घटक तोंडावर आपटले! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

शाहू महाराज यांनी मुंबईला जावे, यासाठी काही घटक प्रयत्न करत होते. विनंतीही करत होते; पण महाराजांनी मराठा बांधवांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना यश आले नाही. 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीस श्रीमंत शाहू छत्रपती महाराज गेले नाहीत. फडणवीस यांनी फोनवरून बैठकीचे निमंत्रण दिले होते, मात्र सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी न जाण्याचे ठरवले. 

आज मुंबईत झालेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले होते. मात्र, शाहू महाराज यांनी ते न स्वीकारता प्रथम आंदोलकांशी चर्चा करणे पसंत केले. फोनवरून दिलेले निमंत्रण सांगण्यासाठी ते थेट दसरा चौकात आले. मुस्लिम बोर्डिंगमध्ये ते आंदोलकांसमवेत चर्चेस बसले. यावेळी दिलीप देसाई, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे यांनी त्यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी बैठकीला बोलावून आंदोलन गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता बैठक नको, तर आरक्षण मिळाले पाहिजे, असा पवित्रा घेण्यात आला. त्यानंतर न जाण्याचा निर्णय शाहू महाराजांनी जाहीर केला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख