बारामती लोकसभेचे पुण्यालगत सात लाख मतदार

बारामती लोकसभा मतदार संघातील हिंजवडी ते फुरसुंगी व्हाया खडकवासला असा शहरी मतदारांचा पट्टा आहे. बारामती लोकसभेचे एकूण मतदान 21 लाख आहे. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजे सात लाख मतदान या शहरी पट्ट्यात आहे.
बारामती लोकसभेचे पुण्यालगत सात लाख मतदार

खडकवासला : बारामती लोकसभा मतदार संघातील हिंजवडी ते फुरसुंगी व्हाया खडकवासला असा शहरी मतदारांचा पट्टा आहे. बारामती लोकसभेचे एकूण मतदान 21 लाख आहे. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजे सात लाख मतदान या शहरी पट्ट्यात आहे.

पूर्वीचा हा ग्रामीण भाग हवेली व मुळशी तालुक्यातील आहे. यातील 38 गावे 1997 साली महापालिकेत समाविष्ट झाली होती. त्यानंतर, 2002 त्यातील 12 पूर्ण व 11 अंशतः महापालिकेत घेतली. या सर्व 38 आणि शहरालगतचा भाग 10- 12 वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले.  तसा हा ग्रामीण भाग मूळ काँग्रेसचा नंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या होता. एकमुखी नेतृत्व दोन्ही काँग्रेसचे असायचे. काही गावात 2004 च्या दरम्यान शिवसेनेचे मतदार वाढले. परंतू भाजपचा विचार 2009 पर्यंत या भागात अजिबात नव्हता. मागील  निवडणुकीत मोदी लाटेत येथे भाजपने आघाडी घेतली होती. त्यामुळे, दोन्ही उमेदवार सुट्टीच्या दिवशी आवर्जून या भागात रॅली काढून प्रचार करण्यावर भर देत आहेत.

भोर मतदार संघातील मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण, मारुंजी, सुस, नांदे, म्हाळुंगे, लवळे, पिरंगुट, भुकुम, भुगाव व बावधन बुद्रुक येथे सुमारे लाखभर मतदान आहे. बावधन खुर्द, वारजे माळवाडी, शिवणे उत्तमनगर, कोंढवे धावडे, खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, वडगाव, धायरी, नऱ्हे, धनकवडी, बालजीनगर, बिबवेवाडी असा शहरी पट्टा आहे. खडकवासला मतदार संघाचे एकूण मतदान चार लाख 72 हजार मतदान आहे. त्यातील 80 टक्के मतदान शहरी भागालगत आहे. तर, पुरंदर मतदारसंघात हवेली तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. पुरंदर मतदार संघात सुमारे तीन लाख 47 हजार मतदार आहे.

त्यातील सुमारे 35 ते 40 टक्के म्हणजे सव्वा ते दीड लाख मतदान शहरीपट्ट्यात आहे. यामध्ये आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांबुळवाडी, दत्तनगर, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, धबाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, येवलेवाडी, उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी, औताडे हांडेवाडी, देवाची उरुळी, शेवाळेवाडी, फुरसुंगी, वडकी या गावांचा त्यात समावेश आहे. शहरी पट्टा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. फक्त मागील निवडणूकीत भाजप व शिवसेनेला जास्त मतदान झाले आहे.

या भागातील प्रश्न
शहरालगत वाहतूक कोंडी, कचऱ्याचा प्रश्न, पूर्व भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्न, हिंजवडी, वडकी, वारजे नांदेड, नऱ्हे, धायरी परिसरात लहान मोठे औद्योगिकिकरण वाढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com