सेवेतल्या अधिकाऱ्याची पिंपरी महापालिकेला कायदेशीर नोटीस

सेवेतल्या अधिकाऱ्याची पिंपरी महापालिकेला कायदेशीर नोटीस

डॉ. रॉय यांनी यापूर्वीच आपल्या पदावनती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर 'जैसे थे'चा आदेश आहे. असे असतानाही प्रथम त्यांचे आर्थिक अधिकार काढून घेण्यात आले. तर, नुकतेच त्यांना पालिकेच्या एकमेव अशा सर्वोपचार रुग्णालयाच्या (वायसीएम) प्रमुखपदावरूनही दूर करण्यात आले .

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गत सत्ताधारी राष्ट्रवादीने पदोन्नती दिलेल्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे पंख छाटण्याचे विद्यमान सत्ताधारी भाजपचे प्रयत्न सुरुच आहेत. त्यामुळे सबंधित अधिकाऱ्याने आता पालिकेला कायदेशीर नोटीसच बजावली आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे हे अधिकारी अद्याप पालिका सेवेत आहेत. असे असूनही त्यांनी आपल्या हक्कासाठी पालिकेविरुद्ध कायदेशीर लढा पुकारलेला आहे.

डॉ. रॉय यांनी यापूर्वीच आपल्या पदावनती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर 'जैसे थे'चा आदेश आहे. असे असतानाही प्रथम त्यांचे आर्थिक अधिकार काढून घेण्यात आले. तर, नुकतेच त्यांना पालिकेच्या एकमेव अशा सर्वोपचार रुग्णालयाच्या (वायसीएम) प्रमुखपदावरूनही दूर करण्यात आले. त्यामुळे त्यांनी वकिलांमार्फत पालिकेला कायदेशीर नोटीस दिली आहे. त्याव्दारे पालिकेने घेतलेला निर्णय रद्द न केल्यास न्यायालयाचा अवमान केला म्हणून दावा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यापूर्वी डॉ. रॉय यांनी महापालिकेच्या विरोधात पंतप्रधान कार्यालयाकडेही  तक्रार केली आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही झाली होती. त्यानंतर डॉ. रॉय यांच्याविरुध्द पालिकेच्याच वायसीएम रुग्णालयातील एका डॉक्टरांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com