Sena-NCP join hands in Yavatmal | Sarkarnama

यवतमाळ जिल्ह्यात सेना-राष्ट्रवादी एकत्र

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 मार्च 2017

पक्षनिहाय पंचायत समित्यांचे सभापती
शिवसेना- यवतमाळ, नेर, दारव्हा, उमरखेड, पांढरकवडा, दिग्रस
कॉंग्रेस- राळेगाव, महागाव, मारेगाव, आर्णी, कळंब,
भाजप- वणी, घाटंजी, बाभुळगाव, झरीजामणी,
राष्ट्रवादी- पुसद

नागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येऊन सत्ता संपादन केली आहे. सेनेने भाजपला व राष्ट्रवादीने कॉंग्रेसला या निवडणुकांत दोन हात दूर ठेवल्याचे चित्र दिसून आले आहे.
जिल्ह्यात एकूण 16 पंचायत समित्यांमधील सभापती व उपसभापतीपदासाठी निवडणूक पार पडली. यात सर्वाधिक पंचायत समित्या शिवसेनेने पटकावल्या. जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांवर सेनेने भगवा फडकाविला. जिल्हा परिषद निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या कॉंग्रेसनेही या निवडणुकीत 5 पंचायत समित्यांवर कब्जा केला. भाजपला 4 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकाच पंचायत समितीमध्ये सत्ता संपादन करता आली. राळेगाव पंचायत समितीचा निकाल ईश्‍वरचिठ्ठीवर लागला. यात कॉंग्रेसचा उमेदवार नसीबवान ठरला. आर्णी पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस व भाजपची आघाडी झाली. सेनेला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस भाजपने आघाडी केली.

 

संबंधित लेख