Sena MP Hemant Godse Diwali | Sarkarnama

आत्महत्याग्रस्तांच्या सांत्वनाने खासदार गोडसेंची दिवाळी

संपत देवगिरे
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

प्रकाश अन्‌ तेजाचा...वाईटावर विजयाचा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. मात्र ग्रामीण भागात समस्याग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक कुटुंबियांना हा उत्सव साजरा करता आलेला नाही. त्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांच्या समवेत फराळ केला. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा व समस्यांचे निराकरण करुन मतदारांसमवेत दिवाळी साजरी केली.

नाशिक : प्रकाश अन्‌ तेजाचा...वाईटावर विजयाचा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. मात्र ग्रामीण भागात समस्याग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक कुटुंबियांना हा उत्सव साजरा करता आलेला नाही. त्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांच्या समवेत फराळ केला. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा व समस्यांचे निराकरण करुन मतदारांसमवेत दिवाळी साजरी केली.

आज सकाळी खासदार गोडसे यांनी सोनगिरी (ता. सिन्नर) येथील शिवाजी भिवाजी बोडके या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांसमवेत आपली सकाळ व्यतीत केली. यावेळी त्यांनी आपल्या घरी तयार केलेला फराळही नेला होता. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचेही नुकतेच दुर्धर आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मुलीचा विवाह झाल्याने ती सासरी असते. त्यामुळे घरातील एकुलता मुलगा सध्या संजय भिकाजी बोडके यांच्याकडे राहतो.

खासदार गोडसे यांनी त्याचे सांत्वन करीत फराळ दिला. तसेच काहीही अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच भगवान रामनाथ बोडके, उपसरपंच किरण लहाने, पोलिस पाटील धनंजय गोविंद बोडके, निलेश लहाने, आप्पा लहाने आदी उपस्थित होते.

संबंधित लेख