Sena Leder Meets BJP Miniseter to Sack BJP's City Chief | Sarkarnama

भाजपच्या सहयोगी नगराध्यक्षाला अपात्र करण्यासाठी शिवसेनेचे भाजप मंत्र्यांनाच साकडे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 डिसेंबर 2018

भाजपच्या मंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक आणि जिल्हा परिषदेत नगरसेवक आणि सदस्यांना आपल्या सोयीनुसार पात्र - अपात्र ठरविल्याचे उदाहरणे आहेत. आता न्यायालयाने गुन्ह्यात दोषी ठरवून शिक्षा दिलेले भाजपचे सहयोगी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अपात्र ठरविण

बीड : आपल्या अधिकाराचा वापर करत आपल्या सोयीने नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांबाबत पात्र - अपात्रतेचा निर्णय घेणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांकडून त्यांच्याच पक्षाच्या सहयोगी नगराध्यक्षांना अपात्र करण्याची अपेक्षा शिवसेनेला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी याबाबत रणजीत पाटील यांना निवेदन दिले आहे. आता, माजलगावच्या नगराध्यक्षांबाबत पाटील काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजलगावमधून भाजपला उमेदवारच देता आला नाही. मग, पक्षाचे आमदार आर. टी. देशमुख यांनी आघाडीकडून रिंगणात असलेल्या सहाल चाऊस यांना पक्षाचा पाठींबा जाहीर केला. सहाल चाऊस विजयीही झाले. मात्र, चाऊस यांना एका गुन्ह्यात शिक्षा झालेली असून सत्र न्यायालयात आता हे प्रकरण आहे. मात्र, चाऊस यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या याचिकेनंतर लोकसेवकाला हा शोभणारा प्रकार नसून, नैतिक अध:पतन संज्ञेत मोडत असल्याने सहाल चाऊस यांना अपात्र करण्याची शिफारस नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना केली आहे. 

मात्र, हे खातेच भाजपकडे असल्याने त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा शिवसेनेला वाटत आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी राज्यमंत्री रणजीत पाटील यांना भेटून सहाल चाऊस यांना अपात्र करण्याच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सहाल चाऊस यांच्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीत ‘नैतिक अध:पतन’ असा उल्लेख आहे. मात्र, राज्यमंत्री त्याचा किती गांभीर्याने विचार करुन निर्णय घेतात हे लवकरच कळणार आहे. 

संबंधित लेख