sena bjp | Sarkarnama

सेना भाजप विसंवादावर शहा ठाकरे यांच्यात चर्चा

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई  : भाजप शिवसेनेमध्ये वाढत असलेला विसंवाद कमी करण्यासाठी दिल्लीतूनच हस्तक्षेप केला जात आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या सत्तेला शिवसेनेच्या पाठिंब्याचा आधार आहे. त्यामुळे भाजप - शिवसेनेच्या संबंध कितीही ताणले तरी तुटणार नाहीत याची काळजी भाजपकडून घेतली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शिवसेनेच्या आमदारांना निधीच्या वाटपात डावलले जात असल्याची तक्रार सेना आमदारांनी पक्षप्रमुखांकडे केली होती. त्यानुसार आपली नाराजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे फोन करून व्यक्त केली होती. त्यानंतर काल रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले असल्याचे समजते. यावेळी राष्ट्रपती पद निवडणुकीसाठी उमेदवार कोण असावा यावर या बैठकीत चर्चा होणार असून अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना या बैठकीचे निमंत्रण दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, आज शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, यांच्यासह आमदार प्रकाश सुर्वे, आमदार अजय चौधरी, आमदार शंभुराजे देसाई, राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेनेच्या या शिष्टमंडळ शिवसेना आमदारांना मिळणाऱ्या विकास निधीबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. यावेळी मुख्यमंत्रांनी अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांनी एकत्र बसून, बजेटमधून किती विकास निधी आमदारांना देता येईल. शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये, विकास निधीचे समान वाटप कसे करता येईल. याबद्दल तोडगा काढण्यास सांगितले असल्याचे समजते. अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांनी, लवकरात लवकर सर्व नियोजन करून आपला आराखडा सादर करावा व त्यानंतर दोन्ही पक्षांच्या आमदारांना, समतोल विकास निधीचे वाटप येणार असल्याचे आश्‍वासन या शिष्टमंडळाला दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

संबंधित लेख