security in mantralaya maratha agitation | Sarkarnama

मंत्रालयात कडेकोट सुरक्षा; अभ्यागतांना सोडले नाही 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

मुंबई : मराठा मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयात आज कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दिवसभरात मंत्रालयात सरकारी कर्मचारी, अधिकारी, पत्रकार वगळता कोणत्याही अभ्यागताला प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मंत्रालयात तुरळक गर्दी होती. उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांच्यात केवळ मराठा मोर्चाचीच चर्चा रंगली होती. 

मंत्रालयातील आवारात पोलिस बंदोबस्त तैनात होता. साध्या तसेच गणवेशातील पोलिस अधिकारी, सुरक्षा रक्षक टेहळणी करीत होते. त्याचबरोबर मंत्रालयात प्रवेश देताना सरकारी अधिकारी-कर्मचारी, मंत्रालयातील कर्मचारी, पत्रकार आणि मंत्री आस्थापना अथवा मुख्यमंत्री कार्यालय यांनी परवानगी दिलेल्या अभ्यागतांनाच आत प्रवेश दिला जात होता. 

बाकीच्यांना प्रवेश देण्यात येत नव्हता. प्रवेश दिल्यानंतर अशा अभ्यागतांची कसून तपासणी, चौकशी, मंत्रालयात येण्याचे कारण, कोणाकडे, असे अनेक प्रश्‍न विचारून, खातरजमा करून अभ्यागतांना आत सोडले जात होते. सरसकट प्रवेश दिला जात नव्हता.  

संबंधित लेख