school and colleges to be closed tomorrow | Sarkarnama

मराठा आरक्षण आंदोलन : पुणे शहर व जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये गुरूवारी बंद राहणार 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांसह सार्वजनिक आणि अभिमत विद्यापीठे उद्या क्रांतीदिनी (ता.9) बंद ठेवण्याची सूचना जारी केली आहे. प्रवासी वाहतूक व्यवस्था मात्र सुरू राहणार आहे.

मराठा समाजाच्या संघटना उद्या विविध ठिकाणी आंदोलन करणार आहेत. या दरम्यान दगडफेकीची शक्‍यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत. रेल्वेसेवा सुरळीत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. एसटी सेवा सुरू ठेवायची की नाही. यावर आज पाच वाजता विभागीय नियंत्रकांनी आढावा बैठक बोलविली होती. मात्र, बससेवा सुरू वा बंद ठेवण्याबाबत उद्या निर्णय घेतला जाणार आहे. 

पीएमपीची बससेवा सुरू की बंद राहणार याचा निर्णय देखील उद्याच होणार आहे. शहरातील स्थितीचा आढावा घेण्यात येईल. परिस्थिती चिघळल्यास बससेवा बंद ठेवण्याचे सूतोवाच अधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांसह सार्वजनिक आणि अभिमत विद्यापीठे गुरूवारी बंद राहतील. पुणे महापालिकेने देखील सर्व प्राथमिक, माध्यमिक महापालिका आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही उद्या बंद राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख