sayyad matin at aurangabad | Sarkarnama

नगरसेवक सय्यद मतीनने तुरुंगातून सुटल्यावर मानले आझमींचे आभार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात एमपीएडी अंतर्गत गेल्या महिन्यात एक वर्ष स्थानबध्दतेची कारवाई केली होती. या कारवाईच्या विरोधात मतीन याने न्यायालयात धाव घेतली, सुटकेसाठी समाजवादी पार्टीचे नेते अबू आसीम आझमी यांची मदत घेतली होती. मतीन याच्यावर एमपीएडी अंतर्गत करण्यात आलेली कारवाई रद्द ठरवत त्याची सुटका करण्यात आली. या सुटकेबद्दल अबू आझमी यांचे आभार मानत मतीन याने त्यांची मुंबईत जाऊन खास भेट घेतली. 

माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर औरंगाबाद महापालिकेतील श्रध्दांजली प्रस्तावाला सय्यद मतीन याने विरोध केला होता. आक्षेपार्ह विधान करत त्याने वाजपेयींना श्रध्दांजली वाहण्यास विरोध करत निषेध नोंदवला होता. यावरून भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहातच मतीन यास बेदम मारहाण केली होती. तर महापालिकेबाहेर मतीनच्या समर्थकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याची गाडी फोडत चालकाला मारहाण केली होती. विशेष म्हणजे श्रध्दांजलीला विरोध हा सय्यद मतीन याचा वैयक्तिक निर्णय होता, त्याच्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही असे एमआयएमने स्पष्ट केले होते. 

महापालिकेतील प्रकार, शहरात उसळलेल्या दंगलीत सहभाग यासह अनेक गुन्हे दाखल असलेल्या सय्यद मतीन याच्यावर एमपीएडी अतंर्गत कारवाई करण्याची मागणी भाजपने पोलिसांकडे केली होती. त्यानंतर आठवडाभरात मतीन यांच्यावर या कायद्यानूसार एक वर्ष स्थानबध्दतेची कारवाई करत त्याची रवानगी हर्सुल तुरूंगात झाली. पण या निर्णयाच्या विरोधात मतीन याने न्यायालयात धाव घेतली होती. एमआयएमकडून आपल्याला मदत मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर मतीनने थेट समाजवादी पक्षाचे नेते अबू आसीम आझमी यांनाच साकडे घातल्याचे बोलले जाते. 

मागच्या आठवड्यात न्यायालयाच्या आदेशाने मतीन यांची सुटका झाली आणि त्याचे जल्लोषात स्वागत झाले. विशेष म्हणजे तुरूंगातून बाहेर आल्यावर त्याने एमआयएमच्या कुठल्याही नेत्याची भेट घेतली नाही. मुंबई गाठत थेट अबू आझमींची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. 

संबंधित लेख