अहमदनगर नको ,आता अंबिकानगर म्हणा :  संभाजी भिडे 

नगर :याशहराला 'नगर' अथवा 'अहमदनगर' असे संबोधले जाऊ नये, तर ' अंबिकानगर' असे म्हणायला हवे,' असेआवाहनशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले.
sambhajirao bhide guruji
sambhajirao bhide guruji

नगर :     या  शहराला 'नगर' अथवा 'अहमदनगर' असे संबोधले जाऊ नये, तर ' अंबिकानगर' असे म्हणायला हवे,' असे आवाहन  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले.

नगर येथे ' संकल्प सुवर्णसिंहासनाचा, जागर हिंदुत्वाचा' कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. भिडे यावेळी बोलताना म्हणाले ,"शहाजी महाराजांनी शिवछत्रपतींना हिंदवी स्वराज्याचे व्रत दिले. रायगडावर शिवछत्रपतींच्या सुवर्णसिंहासनाची पुनर्स्थापना सव्वा वर्षात करणार असून, त्यासाठी 1 हजार 384 किलो सोने लागणार आहे. प्रत्येक तालुक्‍यातून दोन हजार धारकऱ्यांनी निधी गोळा करायचा आहे. आपण सरकारकडे निधी मागणार नाही,'' 

भिडे म्हणाले, "बारा ज्योतिर्लिंग जपणारे शिवछत्रपती व संभाजी महाराजांची समाधी ज्योतिर्लिंगच आहे. खडा पहारा देण्यासाठी रोज दोन हजार धारकरी रायगडावर जाण्यासाठी तयार करणार आहे. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांचे 64 किलो वजन होते. तेवढ्याच वजनाची मूर्ती सुवर्णसिंहासनावर बसविण्यात येईल.''

"अनेकांनी विविध माध्यमांतून शिवछत्रपतींचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या जीवनाचे मर्म उलगडून कोणी सांगू शकले नाही. हिंदवी स्वराज्य हेच त्यांच्या जीवनाचे मर्म आहे,'' असे सांगून ते म्हणाले, 

"हिंदुस्थान विश्‍वाचा 'बाप' झाला पाहिजे, हे त्यांनी आपल्याला दिलेले व्रत आहे. शहाजी महाराजांनी शिवरायांना दिशा व ध्येय दिले. हिंदवी स्वराज्य व्हावे, असे शहाजी महाराज व जिजाबाई यांच्या मनात होते. त्यामुळे त्यांनी तसेच संस्कार शिवाजी महाराजांना दिले.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com