मुलगा स्वाभिमानीमुळे 13 दिवसांत आमदार झाला, हे विसरु नका! 

जिल्हा परिषदेत स्नुषा शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करण्यासाठीही महाडिक यांनी संघटनेला गळ घातली. खासदार राजू शेटटींचा विरोध असतानाही आम्ही पाठिंबा दिला. आमचा पाठिंबा होता, म्हणूनच महाडिक यांना अध्यक्षपद मिळाले, हे त्यांनी विसरु नये. एवढंच काय, महादेवराव महाडिक विधानपरिषद निवडणूक लढत असताना एक रुपयाही न घेता महाडिक यांना मतदान केले आहे, याची जाणीव तरी महाडिकांनी ठेवणे आवश्‍यक होते.
मुलगा स्वाभिमानीमुळे 13 दिवसांत आमदार झाला, हे विसरु नका! 

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्या महादेवराव महाडिक यांनी मुलाची आमदारकी आठवावी. अमल महाडिकना 13 दिवसात आमदार करण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा वाटा मोठा आहे. स्वाभिमानीचा पाठिंबा होता म्हणूनच महाडिकांच्या स्नुषा जिल्हा परिषद अध्यक्ष बनल्या. असे असताना, महाडिकांना संघटनेच्या मदतीचा विसर पडलाच कसा? असा सवाल करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी आपली चूक सुधारेल, असे सुचक वक्‍तव्य संघटनेचे नेते सावकर मादनाईक यांनी केले. 

गुरुवारी (ता.19) किणी टोल नाक्‍यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्‍काजाम आंदोलन पुकारले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महाडिक हे टोल नाक्‍यावरुन आले. यावेळी भगवान काटे व महाडिक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कार्यकर्ते दिसत नसल्याचे पाहून आंदोलनाती हवा गेली का? असा प्रश्‍न महाडिक यांनी काटे यांना केला. यावर हसतच काटे यांनी हवा झाली, की तुम्हाला सांगतो असा प्रतीटोला दिला. यानंतर काही वेळातच स्वाभिमानीच्या हजारो कार्यकर्त्यांनी महामार्ग बंद केला. चक्‍काजाम आंदोलनानंतर मात्र महाडिक यांचा काटे यांच्याशी झालेला संवाद व्हायरल झाला असून त्यावर स्वाभिमानीतून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

महाडिक यांच्या वक्‍तव्यावर स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी संघटनेची भूमिकाच स्पष्ट केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाडिक यांना अनेकवेळा मदत केली आहे. महाडिक यांनी पुत्र अमल महाडिक यांना ऐनवेळी कोल्हापूर दक्षिणमधून भाजपची उमेदवारी घेतली. या मतदारसंघात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. महाडिक यांनी खासदार राजू शेटटी यांना मदतीसाठी साकडे घातले. खासदार शेटटी यांनीही महाडिक यांच्यासाठी सभा घेवून प्रचार केला. मुलाला 13 दिवसात आमदारकी मिळवली जो डांगोरा पिटला जात आहे ते केवळ स्वाभिमानीमुळेच, हे महाडिकांनी विसरु नये, असा टोला मादनाईक यांनी लावला. 

मी स्वाभिमानीचा कार्यकर्ता असून स्वाभिमानी दूध संघाचा संचालक आहे. मात्र आजपर्यंत या संघाचा चहा देखील घेतलेला नाही. महाडिक हे तर गोकुळ संघाचे नेते आहेत. मग गोकुळमध्ये टॅंकर कोणाचे, तेथील मलई कोणाची, विविध टेंडर कोणाचे पाहुणे घेतात याची माहितीही महाडिक यांनी जाहीर करावी, अशी मागणी मादनाईक यांनी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com