save pune rural police moblie number | Sarkarnama

पुणे जिल्हा पोलिसांचे हे मोबाईल नंबर तुमच्याकडे आहेत का? नसतील तर सेव्ह करा!

धोंडिबा कुंभार
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

पिरंगुट : पुणे ग्रामीण पोलिसांशी आता सर्वसामान्यांच्या मोबाईलवरूनही संपर्क साधता येणार आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या  अभिनव कल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाणे तसेच उपविभागाला मोबाईल क्रमांक पुरविला असून सर्वसामान्य जनता या मोबाईल क्रमांकाच्याद्वारे पोलिसांशी व्हाट्सअॅप  तसेच फेसबुकच्या माध्यमातून थेट संपर्क साधू शकणार आहे.

त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाणे व उपविभागाकरिता ९५५२ या सिरिजने सुरू होऊन १०० या क्रमांकाने शेवट होणारे मोबाईल क्रमांक जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे पुरविण्यात आलेले आहेत.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाचा उपयोग करून माहितीची देवाण घेवाण जलदरित्या व्हावी तसेच या माध्यमातून पोलिस यंत्रणेचा व सर्वसामान्य जनतेचा वेळ वाचावा या करिता तसेच नागरिकांना सहजपणे पोलिस प्रशासनाशी संपर्क साधता यावा ,  त्यांच्याकडील समस्या व माहिती त्यांना दृकश्राव्य माध्यमातून देखील पोलिस प्रशासनापर्यंत पोचविता याव्यात , तसेच व्हाट्सअॅप , फेसबुक यांसारख्या समाज माध्यमातून जनतेशी सहसंबंध प्रस्थापित करावे आदी उद्देशांसाठी संदीप पाटील यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 

सदरचे मोबाईल क्रमांक हे चोवीस तास उपलब्ध राहणार असून सर्वसामान्य नागरिक त्यांच्या तक्रारीबाबतची माहिती , अन्य उपलब्ध होणारी उपयुक्त माहिती , फोटो , व्हिडिओ या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअॅपच्या माध्यमातून पाठवू शकतात. सर्वसामान्य नागरिक सदर मोबाईल क्रमांकावरून कॅाल करून सु्द्धा माहिती देऊ शकतात. याशिवाय प्रत्येक पोलिस ठाण्याशी फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातूनही संपर्क करू शकतात , असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.  

 पोलिस ठाणे व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे - बारामती (एसडीपीओ) - ९५५२२३०१०० , बारामती शहर - ९५५२२८७१०० , बारामती तालुका - ९५५२२९३१०० , इंदापूर - ९५५२२९८१०० , वालचंदनगर - ९५५२३६८१०० , भिगवण - ९५५२३८६१०० , वडगाव निंबाळकर - ९५५२३९७१०० , दौंड (एसडीपीओ) - ९५५२६३०१०० , दौंड - ९५५२६१२१०० , शिरुर - ९५५२६३४१०० , शिक्रापूर - ९५५२६५३१०० , यवत - ९५५२६५४१०० , रांजणगाव एमआयडीसी - ९५५२६७६१०० , भोर (एसडीपीओ) - ९५५२६५०१०० , जेजुरी - ९५५२६७८१०० , सासवड - ९५५२६८७१०० , राजगड - ९५५२६८९१०० , भोर - ९५५२५९३१०० , हवेली (एसडीपीओ) - ९५५२४८२१०० , हवेली - ९५५२७५३१०० , लोणी काळभोर - ९५५२७७८१०० , वेल्हा - ९५५२८१३१०० , लोणीकंद - ९५५२८९३१०० , खेड (एसडीपीओ) - ९५५२८९०१०० , खेड - ९५५२१९२१०० , घोडेगाव - ९५५२०९७१०० ,  मंचर - ९५५२०९४१०० , जुन्नर (एसडीपीओ) - ९५५२९५०१०० , जुन्नर - ९५५२१६४१०० , नारायणगाव - ९५५२१३७१०० , ओतूर - ९५५२१५७१०० , आळेफाटा - ९५५२१८६१०० , देहूरोड (एसडीपीओ) - ९५५२२०६१०० , पौड - ९५५२४६४१०० , लोणावळा (एसडीपीओ) - ९५५२७८०१०० , लोणावळा शहर - ९५५२०२६१०० , लोणावळा ग्रामीण - ९५५२०६३१०० , कामशेत - ९५५२०६९१०० , वडगाव मावळ - ९५५२०१८१०० , सायबर पोलिस ठाणे - ९५५२६७०१०० , एलसीबी - ९५५२६८०१०० , नियंत्रण कक्ष पुणे - ९५५२६९०१००.

संबंधित लेख