Savarkar Thakre Paintings | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

स्वातंत्र्यवीर आणि शिवसेनाप्रमुखांची तैलचित्रे आता पालिकेच्या सभागृहात

उत्तम कुटे
बुधवार, 26 एप्रिल 2017

सावरकर आणि ठाकरे या दोघा सर्वमान्य नेत्यांची तैलचित्रे लावण्याच्या विचारात असल्याचे वृत्त सरकारनामाने दिले होते. शासकीय आदेशानुसार सभागृहात 24 छायाचित्रे लावण्यासच मान्यता आहे. त्यात सावरकर आणि ठाकरे यांचा समावेश नाही. तसेच यापूर्वी लावण्यात आलेल्या तैलचित्रातीलही काही या नियमात न बसणारी आहेत. त्यामुळे ही नवी दोन तैलचित्रे लावण्याचा ठराव संमत करून तो आता अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.

पिंपरी - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तैलचित्रे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहात लागणार आहे. तसा ठराव मंगळवारी (ता.25) पालिकेच्या सर्वसाधारण सभेने संमत केला. त्यामुळे सभागृहातील तैलचित्रांचा आकडा आता 15 होणार आहे.

या दोघांची चित्रे लावण्याच्या विचारात प्रशासन असल्याचे वृत्त सरकारनामाने दहा दिवसांपूर्वी (ता.15) प्रसिद्ध केले होते. ते तंतोतंत खरे ठरले. वरील दोघांसह शहीद तुकाराम ओंबाळे आणि स्व. विलासराव देशमुख व स्व. गोपीनाथ मुंढे अशा 13 महापुरुष आणि नेत्यांची तैलचित्रे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहात लावण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, फक्त दोन छायाचित्रांसाठी जागा असल्याने गेल्या सात वर्षापासून ती प्रलंबित राहिली होती.

या पेचातून मार्ग काढण्याकरिता सावरकर आणि ठाकरे या दोघा सर्वमान्य नेत्यांची तैलचित्रे लावण्याच्या विचारात असल्याचे वृत्त सरकारनामाने दिले होते. शासकीय आदेशानुसार सभागृहात 24 छायाचित्रे लावण्यासच मान्यता आहे. त्यात सावरकर आणि ठाकरे यांचा समावेश नाही. तसेच यापूर्वी लावण्यात आलेल्या तैलचित्रातीलही काही या नियमात न बसणारी आहेत. त्यामुळे ही नवी दोन तैलचित्रे लावण्याचा ठराव संमत करून तो आता अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर ती लावली जाणार आहेत.

ठाकरे यांचे तैलचित्र लावा, अशी मागणी त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी केली होती. तर, सावरकरांचे लावण्याबाबत सर्वपक्षीयांचाच आग्रह होता. सभागृहातील अण्णासाहेब मगर, महात्मा फुले,अण्णासाहेब पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रा. रामकृष्ण मोरे, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न राजीव गांधी यांच्याजोडीने आता सावरकर आणि ठाकरे यांची तैलचित्रे सुद्धा सभागृहाची शोभा वाढविणार आहेत.

संबंधित लेख