satyajeet tambe on flyover | Sarkarnama

भाजप सरकार भूमिपूजन स्पेशालिस्ट : सत्यजित तांबे 

सरकारनामा ब्युराे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

नगर : उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी भाजपा नेत्यांनी खटाटोप चालविला आहे. नगरकरांसाठी अस्मिता ठरलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा सध्या सरकारने पुर्णतः खेळ चालविला आहे. खरे तर सध्या या सरकारची प्रतिमा केवळ जाहिरातबाजी व भूमिपूजन स्पेशालिस्ट सरकार म्हणून झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला. 

तांबे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उड्डाणपुलाबाबत आपण मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो होतो. हा पुल लवकर होईल, असे आश्वसानही त्यांनी दिले होते. पण भाजप नेत्यांना याचे श्रेय आपल्याला घेण्याची घाई झाली होती. त्यांनी लगेचच बैठक घेऊन उड्डाणपुलाच्या उदघाटनाची तारीखही जाहीर करून टाकली. आपण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आपण भूमिपूजनाला नव्हे, लोकार्पणाला यावे, असे म्हटले होते. पुलाविषयीच्या अनेक तांत्रिक बाबी अपूर्ण आहेत. असे असताना उदघाटन जाहीर केलेच कसे, हा प्रश्न आहे. केवळ श्रेय घेण्यासाठी हा खटाटोप झाला असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख