satyajeet tambe elected as youthcongress state president | Sarkarnama

युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजीत तांबे  

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत.

पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे हे सर्वाधिक मते घेऊन प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्यासोबतच आमदार अमित झनक हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन उपाध्यक्ष झाले. कुणाल राऊत हेदेखील उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहे. याखेरीज ६० युवकांची प्रदेश कार्यकारणी देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तयार झाली आहे.  

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१४ ला कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून एनएसयुआय व युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात संघटनबांधणी त्यांनी केली आहे.

अभ्यासू, आक्रमक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेला कॉंग्रेसमधील युवानेता अशी त्यांची ओळख आहे.  माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. या आगोदर दोन वेळा त्यांनी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. नागरी विकास, अंतरराष्ट्रीय राजकारण आणि युवक सशक्तीकरण या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे.

 

संबंधित लेख