satish sawant criticise deepak kesarkar | Sarkarnama

केसरकरांनी 'सांभाळून घ्या' म्हणून PI ला फोन केला, पण त्यांनी कलमे सांगून गुन्हाच दाखल केला!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कुणीही अधिकारी पालकमंत्र्यांचे ऐकत नाहीत

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष,खासदार नारायण राणे काल विश्‍वास यात्रेच्य निमित्ताने तालुका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिकेची झोड उठवली. केसरकर व खासदार विनायक राऊत यांना पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केसरकरांचा एक किस्सा ऐकवला. 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी हे नायब तहसीलदारांना मारहाण करतात आणि स्वतःला गृहराज्यमंत्री म्हणवणारे केसरकर पोलिस निरीक्षकाला फोन करून तो कार्यकर्ता आहे, सांभाळून घ्या असे सांगतात. मात्र, ते अधिकारी त्यांना न घाबरता कायद्याची कलमे सांगून गुन्हा दाखल करतात. कुणीही अधिकारी पालकमंत्र्यांचे ऐकत नाहीत, ते तुमच्यासाठी काय करणार, असे सावंत म्हणाले.

संबंधित लेख