Satej Patil wins maximum grampanchayats in south constituency | Sarkarnama

 सतेज पाटील यांचा ग्रामपंचायत निवडणुकात ' दक्षिण' विजय , महाडिकांच्या गावात झेंडा फडकावला !

निवास चौगले-सरकारनामा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर   : विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही पिछेहाट झालेल्या आमदार सतेज पाटील यांनी या सर्व पराभवांचा वचपा ग्रामपंचायत निवडणुकीत काढला. त्यांच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील 10 पैकी सात गावांचे  सरपंच पद सतेज पाटील यांनी खेचून आणले . पाचगांव, उचगांव या मोठ्या गावांतील सरपंच पदासह सत्ताही मिळवून त्यांनी  या मतदार संघावरपकड पक्की केली आहे . 

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत श्री. पाटील गृहराज्यमंत्री होते. त्यांच्याविरोधात माजी आमदार महादेवराव महाडीक यांचे पुत्र अमल हे भाजपाच्या तिकिटावर उभे राहीले. अवघ्या पंधरा दिवसांच्या उमेदवारीव अमल यांनी श्री. पाटील यांचा 8 हजार मतांनी पराभव केला. हा पराभव श्री. पाटील यांच्या जिव्हारी लागला.

 त्यानंतर राजकारणापासून काही काळ अलिप्त राहीलेल्या श्री. पाटील यांनी आपली ताकद "गोकुळ' च्या निवडणुकीत दाखवून दिली, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी विरोधक अर्थात श्री. महाडीक यांना मात्र त्यांनी घाम फोडला. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या मतदार संघातील पाचपैकी तीन जागांवर पुन्हा पराभव पत्करावा लागला. 

विधानसभेपासून आतापर्यंत झालेल्या सर्वच पराभवांचा वचपा श्री. पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत काढला. पाचगांव गावच्या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी सरपंच पदासह सदस्य पदाच्या 17 पैकी 15 जागा जिंकल्या. उचगांवमध्येही सरपंच मिळवले, याशिवाय मोरेवाडी, नेर्ली, सरनोबतवाडी, कणेरीवाडी गावांतील सरपंच पदासह ग्रामपंचायतींची सत्ताही श्री. पाटील यांनी आपल्या गटाकडे घेऊन आपणच या मतदार संघावर "स्वार' असल्याचे सिध्द करून दाखवले. 

केवळ आपल्या मतदार संघातच नव्हे तर शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) या आमदार अमल महाडीक यांच्या गावांतही त्यांनी दोन खवरे बंधूंना एकत्र करून या गावची सत्ताही आपल्याकडे खेचली. या गावांत सरपंच पदी त्यांचे नेतृत्त्व मानणारे शशिकांत खवरे सरपंच झाले तर सदस्य पदाच्या 9 जागाही जिंकून या ग्रामपंचायतीत सत्ता मिळवताना श्री. पाटील यांनी महाडीक गटाला चांगलाच शह दिला. 

संबंधित लेख