satej patil supporters raise objection on multistate | Sarkarnama

`गोकुळ`चा राजाराम कारखाना होवू द्यायचा कां? 

सुनील पाटील 
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

कसबा बावडा येथे असणारा छत्रपती राजाराम सहकारी कारखाना हा साडे चारतालुक्‍यांसाठी होता. मात्र, या कारखान्यात सांगली जिल्ह्यातील येलूरमधील सभासदही करून घेतले आहेत. याच मतदारांच्या जोरावर तिथे सत्ता घेतली जाते. तसे गोकुळ एकदा मल्टिस्टेट झाला तर कोल्हापूर जिल्ह्याचा दूध संघ इतर राज्यात पसरविणाऱ्यांचे मतदार हे कर्नाटकमधून येथे येतील, अशी भूमिका सतेज समर्थकांनी मांडली. 

कोल्हापूर : राजाराम कारखान्यात जे घडतंय ते गोकुळमध्ये नको. मल्टिस्टेट झाले तर मात्र गोकुळचा राजाराम कारखाना झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केले. 

आमदार सतेज पाटील यांच्या कार्यालयात यासंबंधीची पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रदिप पाटील-भुयेकर म्हणाले, राजाराम कारखाना साडे चार तालुक्‍यांसाठी होता. मात्र या कारखान्यात सांगली जिल्ह्यातील येलूर या गावातील सभासद ही करण्यात आले. त्यामुळे या गावातील सभासदांच्या जोरावर (येलूर हे महादेवराव महाडिक यांचे मूळ गाव आहे) सत्ता मिळविली जात आहे. त्यामुळे गोकुळ संघही मल्टिस्टेट झाला तर कर्नाटकातील मतदार मतदान करायला येतील. हा धोका ओळखून गोकुळ संघाचा राजाराम कारखाना होवू नये, यासाठी उठाव केला पाहिजे. 

बाबासाहेब देवकर म्हणाले, गोकुळ मल्टिस्टेट झाल्यानंतर या संघावरील सभासदांचाच नव्हे तर कामगारांच्या हक्कावरही गदा येणार आहे. याचा विचार करून कामगार संघटनांनीही उठाव केला पाहिजे. विश्‍वास नेजदार म्हणाले, गुंडांच्या आणि बगलबच्चांच्या जोरावर हुकमशाही केली जात आहे. ही मोडित काढली पाहिजे. सभासदांनाही आक्रमक होण्याची गरज आहे. 

संबंधित लेख