satej patil questions to gokul | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आमदार सतेज पाटील यांचे "गोकुळ'ला 34 प्रश्‍न ! 

युवराज पाटील 
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघातील (गोकुळ) भ्रष्टाचारासंबंधी 34 प्रश्‍न विचारून आमदार सतेज पाटील यांनी श्री. महाडीक यांच्यावर राजकीय "वार' आज केला आहे. 

कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघातील (गोकुळ) भ्रष्टाचारासंबंधी 34 प्रश्‍न विचारून आमदार सतेज पाटील यांनी श्री. महाडीक यांच्यावर राजकीय "वार' आज केला आहे. 

"गोकुळ' ची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. 15) आहे. या पार्श्‍वभुमीवर श्री. पाटील यांनी पत्रकाव्दारे विचारलेल्या प्रश्‍नांची माहिती व संघात झालेल्या गैरव्यवहाराचा भांडाफोड प्रसिध्दी माध्यमांकडे केला आहे. गेल्यावर्षीही श्री. पाटील यांनी सभेत विचारलेल्या प्रश्‍नांवरून मोठा गदारोळ झाला होता. श्री. महाडीक यांचे अर्थिक सत्ताकेंद्र अशी "गोकुळ' ची ओळख आहे. त्यावरच राजकीय घाव घालण्याचा प्रयत्न श्री. पाटील यांनी या माध्यमातून केला आहे. 

श्री. पाटील यांनी विचारलेले काही प्रश्‍न असे : 
1. बल्क कुलर आरंभी शिल्लक 1 कोटी 36 लाख 94 हजार 439 रूपये असताना त्याचा वापर न करता नवीन बल्क कुलर दोन कोटी 72 लाख 3 हजार 446 रूपयांना खरेदीचे कारण काय? अनुदानित बल्क कुलर किती शिल्लक आहेत. त्याची किंमत किती? त्याचा वापर झाला का? संघाची चालू मालमत्ता 137 कोटी 36 लाख 29 हजार 395 रूपये तर कायम मालमत्ता 128 कोटी 99 लाख 72 हजार 536 रूपये इतकी दाखविली आहे. चालू मालमत्तेची सविस्तर यादी या अहवालात दाखविण्यात आलेली नाही. 
2. चालू खात्यावर 54 कोटी 3 लाख 64 हजार 418 इतकी रक्कम आहे. यूथ डेव्हलपमेंट बॅंक, पार्श्‍वनाथ बॅंक, वीरशैव बॅंक या बॅंकातील खात्यावर दाखविली गेली आहे. या बॅकांचा गेल्या तीन वर्षात ऑडिट वर्ग कोणता आहे? त्यांचा थेट एन. पी. ए. शून्य टक्के आहे का? या बॅका आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने योग्य आहेत का? 
3. गोकुळ शॉपीमध्ये किती रक्कमेचा अपहार झाला आहे? शॉपीचे व्यवस्थापन संघाकडे आहे की भाडेतत्वावर ती देण्यात आली आहे. संचालक मंडळाने अपहार प्रकरणी कोणती कार्यवाही व कारवाई केली? अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्यात आली आहे का? 
संघातील नोकरभरतीसाठी कोणते निकष लावले आहेत? भरतीस शासनाची मान्यता आहे का? 
4. महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना मध्ये 182 कोटी 87 लाख 24 हजार 292 व या मार्चअखेर 230 कोटी 72 लाख 25 हजार इतकी उलाढाल नाममात्र दिसते. नफा तोटा पत्रकात वेगळी रक्कम दाखविली गेली आहे. एनडीडीबी व मुख्यालयावरील खर्चाच्या आकडेवारीची तुलना करता आठ कीटीे 43 लाख 5 हजार 523 रूपयांची वाढ दिसते. सात कोटीहून अधिक रक्कमेच्या जाहीरातीवर खर्च झाला आहे त्यास सहकार विभागाची मान्यता आहे का? 
5. सीमाभागातील दूध उत्पादकांना प्रति लीटर दोन रूपयांनी दर कमी देण्यामागे कारण काय? कार्यक्षेत्राबाहेर 92 लाख 61 हजार लीटर दूध खरेदी केले आहे. प्रति लीटर खर्च स्थिर राहण्यास मदत होत असताना दर कमी का दिला जातो. 
6. मुंबईचे दूध वितरक इतर संघाचे दूध विकतात त्यांच्यावर कोणती कारवाई केली? वार्षिक सभा दुपारी एक ऐवजी सकाळी अकरा वाजता का बोलविली. जास्तीत जास्त सभासद उपस्थित राहू नयेत असा यामागे हेतू आहे का? 

संबंधित लेख