Satej Patil criticizes Chandrakant Patil | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

"गोकुळ' बद्दल पालकमंत्री गप्प का : सतेज पाटील यांचा सवाल

सुनील पाटील
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : सहकारमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी सहकाराचे शुद्धिकरण करणार असे सांगितले होते, पण "गोकुळ' मध्ये ठराव बदलण्याचा प्रकार घडला, हे माहिती असूनही श्री. पाटील हे या संघात भाजपाचा एक संचालक आहे म्हणूनच गप्प आहेत का, असा सवाल कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

"गोकुळ'च्या वार्षिक सभेचे ठराव वाचन अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केल्याचे खोटे प्रोसिंडिंग लिहणाऱ्यासह सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्यावर फौजदारी दाखल करणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

सतेज पाटील म्हणाले, "गोकुळ' च्या सभेसाठी हजारो सभासद उपस्थित होते. सर्व माध्यमांचे प्रतिनिधीही होते. सभेत विश्‍वास पाटील यांनी नाही तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ठराव वाचन करून मंजूर करून घेतले आहे. याला हजारो सभासद व माध्यम प्रतिनिधीही साक्षी आहेत. तरीही, सहाय्यक निबंधकांना चुकीची आणि खोटी माहिती देण्याचे काम गोकुळ संचालकांनी केले आहे.`

याचीची चौकशी करावी यासाठी 26 स्पटेंबरला दुग्ध विभागातील सहाय्यक निबंधकांना पत्र दिले होते. त्यानूसार त्याची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांनी दिली होती.

सहाय्यक निबंधकांनीही जसा गोकुळने खुलासा दिला आहे, तोच अहवाल विभागीय उपनिबंधकांना देवून मोठी चुक केली आहे. गोकुळने आपला खुलासा दिला असला तरीही वस्तूस्थिती काय आहे, याचे मत सहाय्यक निबंधकांनी दिले पाहिजे होते. मात्र, सहाय्यक निबंधकांचे कार्यायलय हे गोकुळ कार्यालयाशेजारी असल्याने संबधीत अधिकाऱ्यावर गोकुळचा "दबाव' असावा. त्यामुळेच त्यांनी चुकीचा अहवाल विभागीय उपनिबंधकांना दिला आहे. चुकीचा अहवाल आणि स्वता त्याची पडताळणी न करता अहवाल सादर करणाऱ्या सहाय्यक निबंधकांवरही फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. 
 
संबंधित लेख