अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्यजित पाटलांनी शाहूवाडी-पन्हाळा  तालुक्यांसाठी आणले दहा कोटी

सध्या सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये पहील्याच दिवशी अर्थसंकल्पातून मतदारसंघातील शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील मुख्य रस्ते व पुलांच्या कामासाठी 10 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आमदार सत्‍यजित पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्यजित पाटलांनी शाहूवाडी-पन्हाळा  तालुक्यांसाठी आणले दहा कोटी

सरूड : सध्या सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये पहील्याच दिवशी अर्थसंकल्पातून मतदारसंघातील शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील मुख्य रस्ते व पुलांच्या कामासाठी 10 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आमदार सत्‍यजित पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

या मंजुर निधीमधुन मतदारसंघातील मुख्य रस्त्यांची सुधारणा तसेच वाहतुकीस अडचणीचा असलेल्या पन्हाळा तालुक्यातील पोर्ले-माजगांव पुलाचे रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे
मंजुर कामे व निधी पुढील प्रमाणे:
पोर्ले ते उत्रे रस्ता सुधारणा करणे - 25 लाख ,पन्हाळा ते वाघबीळ रस्ता सुधारणा करणे - 40 लाख,पोर्ले - माजगांव पुलाचे रुंदीकरण करणे- 2 कोटी,राष्ट्रीय मार्ग 192 पोखले फाटा ते कोडोली सर्वोदय चौक रस्ता सुधारणा करणे - 28 लाख(सर्वपन्हाळा तालुका),राघुचावाडा ते उदगिरी रस्ता मजबुतीकरणासह सुधारणा करणे - 1 कोटी 12 लाख,हाडकेचा माळ ते उदगिरी रस्ता मजबुतीकरणासह सुधारणा करणे -5 कोटी 20 लाख,मालेवाडी ते सोंडोली रस्ता सुधारणा करणे -98 लाख (सर्व शाहूवाडी तालुका) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com