satej patil about mahdik visit | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

महाडिक येणार असल्याचे माहित असतेतर घरीच थांबलो असतो!

​सुनील पाटील 
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

ती लोकशाही गोकुळच्या वार्षिक सभेतही दिसून यावी!

कोल्हापूर : लोकशाही मेली काय? हे विचारण्यासाठी कसबा बावड्यात आलेल्या महादेवराव महाडिक यांनी गोकुळच्या वार्षिक सभेत हीच लोकशाही जिवंत ठेवावी, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिले.

आमदार पाटील म्हणाले, श्री महाडिक यांनी पूर्वसूचना दिली असती तर आपणही घरी थांबवलो असतो. महाडिक यांनी ज्या लोकशाहीबाबत सांगितले ती लोकशाही गोकुळच्या वार्षिक सभेतही दिसून यावी. गोकुळच्या सभेत सर्व सभासदांच्या प्रश्‍नांना उत्तर द्यावीत, विरोधकांना मंडपात बसण्याची व्यवस्था करावी.

दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आलेल्या महाडिक यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते दिलगिरी व्यक्त करण्यासाठीच आले असल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही, बावडा सोडल्यानंतर त्यांची भूमिका बदलली असेल तर तो त्यांचा प्रश्‍न असल्याचेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. 

संबंधित लेख