satayara on yogi adittynatha | Sarkarnama

 जय अलख, जय गोरख 

कानोजी
रविवार, 9 सप्टेंबर 2018

योगी आदित्यनाथ हे भारतातील सर्वांत मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री. त्यांच्या प्रांतातून लोकसभेवर सर्वाधिक खासदार निवडून जातात त्यामुळेही असेल; पण संघ परिवाराला नाथांचे फार कौतुक. भारतीय परंपरेत राजाला उपभोगशून्य स्वामी मानतात म्हणजे एका अर्थाने संन्यासी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत आपल्या या भूमीत राजा तर संन्यासी असतोच पण आता तर संन्यासीही राजा झाल्याची भावना व्यक्‍त करत, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. योगींनाही राहवले नाही. 

ते म्हणाले, "खरे तर मला साधूसंतांबद्दल कमालीचा तिटकारा. ही मंडळी समाजासाठी काही करत नाहीत असे मला वाटे. विद्यार्थी असताना मी गोरखपूर आश्रमाचे संत अवैद्यनाथ यांना भेटायला गेलो. पहिल्याच भेटीत त्यांनी पंथात सामील होण्याची गळ घातली. मी कुणालाही गंडा बांधत नाही, पण तू मात्र माझा शिष्य हो अशी हाक दिली. मला त्यातील काहीच न पटल्याने मी नकार दिला. काही वर्षांनी ते दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल झाले. तब्येत फारच खालावली होती म्हणून मी गेलो, तर गुरुजी म्हणाले, की अब चले आओ. त्यानंतर मी संन्यास घेतला आणि गोरख पंथात सामील झालो.'' 

शैव संप्रदायाचे आपले गुरुजी वैष्णव पंथाच्या रामजन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख कसे झाले हेही आदित्यनाथांनी सांगितले अन्‌ आपण संन्यास घेऊन आता या परंपरेत सामील झाल्याचे सद्‌गदित होऊन नमूद केले. नाथपंथीय संप्रदाय तसाही साधनेबाबत कमालीचा उग्र. त्या संप्रदायातील पीठाचे प्रमुख झालेल्या योगींचा महिमा कुठवर वाढणार ते आता पाहायचे. 

संबंधित लेख