कमिटमेंट चुकली... खुर्ची रूसली...

समाजकारण व राजकारणात आपली स्वयंभू वाटचाल राहिली आहे. नगरसेवक ते उपनगराध्यक्षपद स्वत: मिळविले आहे. मात्र राजकारणात ज्यांचे नेतृत्व आपण मानले त्यांच्याकडूनच दगाफटका झाला. नेत्यासाठी कार्यकर्ता किती कष्ट घेतो याची जाणीव नेत्यांनी ठेवायला हवी.-संदिप गोडसे (माजी उपनगराध्यक्ष वडूज, ता. खटाव )
sandeep-Godse
sandeep-Godse

वडूज  : वडुज नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संदिप गोडसे यांच्यावरील अविश्वास ठरावानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. उपनगराध्यक्ष निवडीत गोडसे यांना मोलाची साथ देणारे तीन अपक्ष नगरसेवकांनाही प्रत्येकी सव्वा वर्षाची समान संधी देण्याचे ठरले होते.

 मात्र सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होतानाच काही दिवस गोडसे यांच्याकडून चालढकलीची भुमिका घेतली गेली.
त्यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनी फिल्डींग लावली अन्‌ गोडसे यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले. एकूणच कमिटमेंट चुकली... खुर्ची रूसली अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे प्रत्येकी पाच नगरसेवक, भाजप सेना महाआघाडीचे तीन तर चार अपक्ष नगरसेवक आहेत. डिसेंबर 2016 मध्ये येथील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदांच्या निवडी झाल्या होत्या. त्यामध्ये
राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्ष पदावर बाजी मारली होती.

 तर राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे समर्थक मानले जाणारे अपक्ष नगरसेवक संदिप गोडसे यांनी डॉ. सौ. निता गोडसे, शहाजी गोडसे, विपूल गोडसे या तीन अपक्षांची मोट बांधत राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांचे पाठबळ घेत अतिशय
नाट्यमय घडामोडी करीत उपनगराध्यक्ष पदावर बाजी मारली होती. या घडामोडीत साथ करणाऱ्या अपक्ष नगरसेवकांनाही उपनगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकाला सव्वा वर्षाची संधी देण्याची त्यावेळी चर्चा झाली असल्याचे समजते.

गोडसे यांची  शहरात  विविध आंदोलनेही चांगलीच गाजली आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्षपदावर असतानाही त्यांनी पदाची तमा न बाळगता नगरपंचायत कारभार व प्रशासनाबाबत आक्रमक भुमिका घेतली. एका मासिक बैठकीत ते चक्क पोत्यावरच बसले होते. आपणाला विश्वासात घेऊन कामकाज केले जात नसल्याचा त्यांचा सातत्याने आरोप होत होता.

त्यामुळे या काळात मुख्याधिकारी माधव खांडेकर व अन्य कर्मचाऱ्यांशीही त्यांचे काही वेळाचांगलेच खटकेही उडाले. एकीकडे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांसह अन्य नगरसेवक व दुसरीकडे श्री. गोडसे अशीच काहीशी स्थिती गेल्या वर्षभरात निर्माण झाली.त्यामुळे गोडसे यांच्या आश्रयाखाली आलेल्या अन्य अपक्षांच्या मनातही संकोचाची भावना निर्माण झाली असावी.

अशा संघर्षमय परिस्थीतीतच नगरपंचायत कारभाराचा सव्वा वर्षाचा कालावधी उलटला. आणि गोडसे यांच्या भोवती अविश्वास ठरावाचे वादळ फिरू लागले. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनीही त्यादृष्टीने जोरदारफिल्डींग लावली. तर प्रस्थापित सत्ताधाऱी राष्ट्रवादी, भाजप वकॉंग्रेसलाही आयते कोलीत सापडले.

त्यामुळे कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांशिवाय अन्य बाकी सर्वच नगरसेवकांनी गोडसे यांच्या विरोधात अविश्वासावर एकमूठ बांधली. या अविश्वासाबाबत गोडसे यांनी त्यांच्या
वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून आज उद्याचे चालढकलीचे धोरण अवलंबण्यात आल्याने आपणाला अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागल्याचेगोडसे यांनी सांगितले.
गोडसे यांच्यानंतर उपनगराध्यक्षपदाची खुर्ची रिकामी झाली असली तरी याखुर्चीवर आता कोण विराजमान होणार ? याबाबत नागरिकांत उत्सुकता लागूनराहिली आहे.



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com