उदयनराजेंविरोधात लोकसभेला लातूरच्या देशमुखांचे जावई? 

अतूल भोसले हे लातूरच्या देशमुख कुटुंबियांचे जावई आहेत. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू, आमदार दिलीप देशमुख यांच्या कन्येशी अतूल यांचा विवाह झाला आहे. स्वत: भोसले यांच्या कुटूंबाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठा प्रभाव आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेवून भाजपकडून अतूल यांना ताकद दिली जात आहे.
उदयनराजेंविरोधात लोकसभेला लातूरच्या देशमुखांचे जावई? 

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तयारी सुरु केल्यानंतर आता त्यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू झाली आहे. सध्यातरी कऱ्हाडचे युवा नेते अतुल भोसले यांचे नाव पुढे येत आहे. त्यांच्यासोबतच इच्छुकांमध्ये खंडाळ्याचे पुरूषोत्तम जाधव हेही आहेत. 

लोकसभा मतदारसंघात सध्या उदयनराजेंनी रान उठविले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्‍वभूमीवर ते लोकसभेची रणनिती आखत आहेत. राष्ट्रवादीकडून तिकिट मिळविण्यासाठी नेहमीप्रमाणे उदयनराजेंची ही स्ट्रॅटेजी आहे, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.पण राष्ट्रवादीसोबत कॉंग्रेसची युती निश्‍चित असल्याने दोन्ही कॉंग्रेसला मान्य होणारा उमेदवार दिला तरच राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी होणार आहे. 

कऱ्हाडचे युवा नेते व विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना ताकद देण्याचे काम सातत्याने भाजप करत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी भाजपकडून त्यांनाच उमेदवारी देण्याबाबत विचार होऊ शकतो. ते उमेदवार असतील तर कऱ्हाड पाटणमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अपेक्षित मते मिळणे अडचणीचे होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सातारा जिल्ह्यावर असलेला होल्ड पाहता त्यांच्या डोळ्यासमोर सक्षम उमेदवार म्हणून अतुल भोसलेच असू शकतात. परिणामी अतूल भोसलेंना उदयनराजेंविरोधात लढत द्यावी लागेल, अशी शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com