उदयनराजेंच्या डोक्‍यात 'खंडणी'चा राग कायम; टोलनाक्‍याची धुमश्‍चक्री मात्र विसरले? 

उदयनराजेंच्या डोक्‍यात 'खंडणी'चा राग कायम; टोलनाक्‍याची धुमश्‍चक्री मात्र विसरले? 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास दिग्गज नेत्यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. टोलनाक्‍याचा वादातून खासदारांशी वितुष्ट निर्माण झालेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत आहे. पण खंडाळा खंडणी प्रकरणावरुन आरोप झालेले विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मात्र निमंत्रण पत्रिकेवर स्थान देण्यात आलेले नाही. याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. 

उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कामांची भुमिपूजने आणि जाहीर सत्काराचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मैदानावर 24 फेब्रुवारीला होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पाटबंधारे मंत्री गिरिश महाजन, पशूसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सह पालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भैय्यूजी महाराज देशमुख, भारत फोर्जचे बाबासाहेब कल्याणी यांनी स्वीकारले आहे. 

या सर्वांची नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत. विशेष म्हणजे टोलनाका प्रकरणातून वितुुष्ट निर्माण झालेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याही नावाचा समावेश पत्रिकेत आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे व्यासपीठावर उपस्थित राहणार का, हा प्रश्‍न आहे. त्यासोबतच माजी उपमुख्यमंत्री अजित पवाराचेही नाव पत्रिकेत आहे. पण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पत्रिकेत स्थान देण्यात आलेले नाही. सहा महिन्यांपुर्वी खंडाळ्यातील एका कंपनीला खंडणी मागितल्याचा गुन्हा उदयनराजेंवर दाखल झाला होता. या प्रकरणात रामराजेंनी अडकविल्याचा आरोप उदयनराजे समर्थकांनी केला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. साताऱ्यात रामराजेंविरोधात आंदोलनही झाले होते. त्यामुळे या निमंत्रण पत्रिकेची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com