satara udyanraje birthday analysis | Sarkarnama

राष्ट्रवादीचे चार आमदार विरोधात गेल्याने उदयनराजेंना लोकसभा जड जाणार! 

उमेश बांबरे 
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला जमलेली गर्दी ही आगामी लोकसभेची झलक आहे. सलग दोन निवडणुका एक हाती जिंकणाऱ्या उदयनराजेना पहिल्यांदाच सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी थेट विरोध दर्शवून कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. त्यामुळे उदयनराजेना आगामी लोकसभा निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत. 

आपल्या हटके स्टाईलमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या उदयनराजे भोसलेंचा आज वाढदिवस. साताऱ्यात या वाढदिवसासाठी हजारोंची गर्दी जमली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील अशा दिग्गज नेत्यांची फौज या कार्यक्रमाला उपस्थित होती. हे सगळे असले तरी उदयनराजेना दोन वेळा खासदार करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणारे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व दिग्गज नेते अनुपस्थित होते. 

खरेतर उदयनराजेंनी हा कार्यक्रम आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला होता. आतापर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उदयनराजे यांच्यात सतत धुसफूस होत होती मात्र काही काळानंतर सगळे एक होत होते. यावेळी सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली त्यात शिवेंद्रसिहराजे भोसले आणि उदयनराजे समोरासमोर उभे ठाकल्याने सुरु झालेला संघर्ष थांबायचे नाव घेत नाही. त्यातच आता जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि नेतेमंडळी उदयनराजेना थेट विरोध करु लागले आहेत. आजच्या वाढदिवसाला शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील हे मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे भविष्यात सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत. 

संबंधित लेख