उदयनराजेंच्या वाढदिवसाला शिवेंद्रसिंहराजे जाणार का ? 

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवस कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार का, याबाबत तर्कवितर्क वर्तविले जाऊ लागले आहेत. खासदार मतभेद विसरले असले तरी सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या मनातून अद्याप मागील सर्व घटना गेलेल्या नाहीत. निमंत्रण पत्रिकेत नाव असले तरी शिवेंद्रसिंहराजेंना अद्याप थेट निमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे ते कार्यक्रमाला येणार का, हा प्रश्‍न सध्यातरी गुलदस्त्यात आहे.
उदयनराजेंच्या वाढदिवसाला शिवेंद्रसिंहराजे जाणार का ? 

सातारा : सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवस कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार का, याबाबत तर्कवितर्क वर्तविले जाऊ लागले आहेत. खासदार मतभेद विसरले असले तरी सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या मनातून अद्याप मागील सर्व घटना गेलेल्या नाहीत. निमंत्रण पत्रिकेत नाव असले तरी शिवेंद्रसिंहराजेंना अद्याप थेट निमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे ते कार्यक्रमाला येणार का, हा प्रश्‍न सध्यातरी गुलदस्त्यात आहे. 

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका तयार आहेत. या पत्रिकांवर सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव असले तरी अद्यापपर्यंत त्यांना थेट निमंत्रण मिळालेले नाही. साताऱ्याचे आमदार व राज्य शासनाचा प्रतिनिधी आणि प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शासकिय कार्यक्रमात त्यांचे नाव असणे स्वाभाविक आहे. 

तरीही ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, हा प्रश्‍न आहे. मागील मतभेद विसरून खासदारांकडून पत्रिकेत नाव टाकले गेले असले तरी आमदार शिवेंद्रसिंहराजे मात्र, मागील सर्व घटना विसरलेले नाहीत. त्यांच्यामते त्यांना अद्याप ऑफिसियल पत्रिका कोणीही दिलेली नाही. उलट अजित पवार उपमुख्यमंत्री असताना हे काम त्यांनी मंजूर करून आणलेले आहे. 

यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की पालिकेत आम्ही भ्रष्टाचारी आणि चोर आहोत म्हणून आमचे मनोमिलन तुटले होते. आता कशाला पाहिजे तुम्हाला चोर व भ्रष्टाचारी माणसे? भ्रष्टाचारी व चोरांना एवढ्या मोठ्या लोकांनी घेऊन फिरायचे कारण काय? वाढदिवस कार्यक्रमाला आलेच पाहिजे व यावे म्हणून हा अट्टाहास कशासाठी? लोकसभा निवडणूक जवळ आली म्हणून बिनखर्चात निवडणूक व्हावी म्हणून चालले का ? महाराजांचे आदेश काय येतात त्यावर सर्व अवलंबून आहे. कार्यक्रमाला जाईन का नाही ते योग्य वेळी समजेलच. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com